यवतमाळ: विधवा महिलेला गुजरात नेऊन विकलं, नणंद आणि तिच्या पतीनेच केला कांड
Maharashtra Crime : एका विधवा महिलेला तिच्याच नातेवाईकांनी विकलं आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आर्णी तालुक्यातून उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधवा महिलेची नातेवाईकांनीच केली विक्री

मुलेही आहेत बेपत्ता
Maharashtra Crime: लोक पैशांसाठी कधी काय करतील याचा काहीही एक नेम लावता येत नाही. पैशांच्या हव्यासापोटी नातेवाईकांनी एका विधवा महिलेला एक लाख 20 हजार रुपयांची रक्कम मिळवून विक्री केली आहे. विधवा महिलेला मध्यप्रदेशातून गुजरात येथे नेण्यात आले. तिथंच तिची विक्री करण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात उघडकीस आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिचे दोन्ही मुलं हे बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात आर्णी पोलिसांनी चोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : हसावं की रडावं? पत्नीने आपल्याच पतीच्या जीभेचा चावा घेतला, थक्क करणारं कारण समोर आलं
घटनेचा एकूण घटनाक्रम
आर्णी पोलीस हद्दीतील एका महिलेच्या पती व एका मुलाचा अकस्मात मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची असल्याने अन्य एक मुलगा आणि मुलगी ही सासरच्यांकडे राहत होती. महिला निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन तिला रोजगार देतो असं सांगितलं आणि तिच्या नणंदेनं आणि नणंदेच्या पतीने तिला मध्य प्रदेशात नेलं. त्यानंतर त्या महिलेला गुजरात येथे नेऊन 1 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आलं. संबंधित प्रकरणात विक्री करणाऱ्यांमध्ये पीडितेची सासू, सासरे, नणंद आणि तिचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्णी पोलिसांनी सांगितलं की, बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. या महिलेचा एक मुलगा आणि मुलीचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, 2023 मध्ये पीडितेच्या सासरच्यांनी नातवंड बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आर्णी पोलीस हेपत्ता महिलेचा शोध घेत असताना त्यांना ही महिला गावीच असल्याची माहिती समजली.