पत्नी म्हणाली, 'चल जीभ दाखव..' पतीने तोंड उघडताच पत्नीने जीभेचा तुकडाचा पाडला अन् गिळलाही!

मुंबई तक

Viral News : हसावं की रडावं? पत्नीने चक्क आपल्या पतीसोबत वाद घातला आणि जीभच चावली असल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती आणि पत्नींमधील सामान्य वाद

point

त्नीने आपल्या पतीची जीभच चावली

Viral News : पती आणि पत्नींमधील वाद हा सामान्य असतो. घरोघरी मातीच्या चुली हे पती आणि पत्नीच्या वादासाठी देखील वापरण्यात येणारी म्हण असू शकतोच. पण याच पती-पत्नीतील वादामुळे असं काही घडलं की, ज्यामुळे हसावं की रडावं? असा प्रश्न उपस्थित होतो. बिहारमधील पती-पत्नीच्या वादातच पत्नीने पतीच्या जीभेचा चावा घेत ती गिळल्याची अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. 

हेही वाचा : गुरूने आपल्या शिष्यालाही सोडलं नाही, किडनॅप करून लॉजवर नेलं, मुख्य आरोपीसह...हादरवून टाकणारं प्रकरण

हसावं की रडावं? 

गया जिल्ह्यातील खिजरसराय पोलीस ठाणे परिसरातील ही धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. या घडलेल्या घटनेनं एकच खळबळ माजली असून पीडित पती अत्यंत भयग्रस्त झाला आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादामुळे पत्नीनेच आपल्या पतीच्या जीभेचा चावा घेतला आणि ती गिळून टाकली.

ही घटना घडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जखमी झालेल्या पतीला घेऊन एका नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. तेव्हाच पती-पत्नींच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद उफाळला आमि ही घटना घडली, अशी माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा : 28 जुलै रोजी मंगळ ग्रह राशी बदलेल, अन् 'या' राशीतील लोक खोऱ्याने पैसे कमावतील, काय सांगते तुमची राशी?

संबंधित प्रकरणात ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीतील वादादरम्यान, पत्नीने अचानकपणे तिच्या पतीची जीभ चावा घेतला गेल्याचा आरोप करण्यात आला. घटनेला आता 24 तास उलटून गेले असूनही पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झालेली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp