गुरूने आपल्या शिष्यालाही सोडलं नाही, किडनॅप करून लॉजवर नेलं अन्...हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : हॉकी प्रशिक्षकाने प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला लॉजवर नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं आहे. धक्कादायक प्रकरणाचा झाला खुलासा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा

15 वर्षीय हॉकी खेळाडूवर सामूहिक बलात्कार
Crime News : खेळाडू आणि प्रशिक्षकाचं नातं म्हणजे गुरु शिष्याचं नातं असतं. मात्र, याच गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ओडिशातील जिजापूर जिल्ह्यातील आहे. एका 15 वर्षीय हॉकी खेळाडूवर सामूहिक बलात्कार झाल्याची मन हेलावून घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा नराधम दुसरा तिसरा कोणीही नसून हॉकीचा प्रशिक्षक आहे. नराधमाने आपल्यासोबत दोन मित्रांची मदत घेऊन हे घृणास्पद कृत्य केलं आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकण आणि घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय, 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना 21 जुलै रोजी उघडकीस आली. पीडितेनं जाजपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं की, 3 जुलै रोजी सायंकाळी ती घरी परतली असताना तिच्या प्रशिक्षकाने आणि दोन साथीदारांनी तिचं अपहरण केले होते. त्यानंतर आरोपीने तिला एका लॉजवर नेले. तिथं मुख्य आरोपी असलेल्या नराधमाने हॉकीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे.
जाजपूरचे पोलीस अधीक्षक यश प्रताप श्रीमल यांनी सांगितलं की, पीडित खेळाडूने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हॉकी प्रशिक्षकासह चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणातील एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस सध्या त्याच आरोपीचा शोध घेत आहे. उर्वरित तीन आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हेही वाचा : इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण, सायंकाळी उलट्या झाल्या, आईला समजताच...
जीवे मारण्याची दिली धमकी
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, प्रशिक्षकाने त्याच्याच पीडित प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला मारण्याची धमकीही दिली होती. तिने याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिची हत्या केली जाईल, असे तो म्हणाला. पोलिसांनी सांगितलं की, पीडितेनं जिल्हा न्यायालयात आपला जबाब नोंदवला असल्याची माहिती एसपींनी दिली आहे.