इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक शोषण, सायंकाळी उलट्या झाल्या, आईला समजताच...

Crime News : आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर तिच्याच शेजाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. तिला उलट्या झाल्यानंतर तिच्या आईला संशय आला.

crime news

crime news

मुंबई तक

22 Jul 2025 (अपडेटेड: 23 Jul 2025, 01:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाच्या नावाने कलंक

point

आठवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर लैंगिक शोषण

Crime News : हरियाणातील रेवाडीत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर तिच्याच शेजाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. तिला उलट्या झाल्यानंतर तिच्या आईला संशय आला आणि तिने गर्भधारणेची चाचणी केली असता, तेव्हा ती प्रेग्नटं असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पीडित विद्यार्थीनीने तिच्या आईला घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी आरोपी शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईची खबर: आता अटल सेतूवर हायटेक इंटरनेटची सुविधा! पुलाच्या आतून ऑप्टिकल फायबर अन्...

प्रकरण काय? 

ही धक्कादायक घटना रेवाडीतील मॉडेल टाउन पोलीस ठाणे परिसरातच घडली असल्याची माहिती समोर आली. विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिनं सांगितलं की, तिच्या अल्पवयीन मुलीला 20 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास सतत उलट्या येत होत्या. आईने तिला विचारले असता, ती भयभीत झालेली दिसत होती. 

तरुणी प्रेग्नंट असल्याचा संशय..

संबंधित प्रकरणात तरुणी प्रेग्नंट असल्याचा संशय बळावला गेल्याने आईने प्रेग्नंसी किट आणली आणि तिची चाचणी केली, यातून मुलगी प्रेग्नंट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर, जेव्हा आईने मुलीला विचारले तेव्हा तिने सांगितलं की, त्यांच्या शेजारी राहणारा बिहारचा शंकर नावाचा एक तरुण तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेसोबत अश्लील कृत्य केलं. 

संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडितेची परिस्थिती पाहता पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी रुग्णालयात असलेल्या पीडित मुलीकडे धाव घेतली. त्यानंतर तिचा न्यायालयात सोमवारी जबाबही नोंदवला आहे. 

हेही वाचा : पुण्यातील कोंढव्यात तरुणीने डिलिव्हरी बॉयविरोधात खोटा बनाव रचला, अन् स्वत:च अडकली पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी शंकरविरोधात गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

    follow whatsapp