मुंबईची खबर: आता अटल सेतूवर हायटेक इंटरनेटची सुविधा! पुलाच्या आतून ऑप्टिकल फायबर अन्...

मुंबई तक

अटल सेतूवर ऑप्टिकल फायबरचे जाळे बसवण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच समुद्री पुलावर ही हायटेक प्रणाली विकसित केली जाणार आहे. यामुळे चालकांना इंटरनेट सुविधा मिळेल.

ADVERTISEMENT

आता अटल सेतूवर हायटेक इंटरनेटची सुविधा!
आता अटल सेतूवर हायटेक इंटरनेटची सुविधा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अटल सेतूवर मिळणार हाय टेक इंटरनेटची सुविधा

point

पुलाच्या आत बसवण्यात येणार ऑप्टिकल फायबर

Mumbai News: अटलबिहारी वाजपेयी न्हावा शेवा अटल सेतू पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अटल सेतूवर ऑप्टिकल फायबरचे जाळे बसवण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच समुद्री पुलावर ही हायटेक प्रणाली विकसित केली जाणार आहे. यामुळे चालकांना इंटरनेट सुविधा मिळेल. हे फायबर पुलाच्या आत पोकळ भागातून टाकले जाईल.

देशातील सर्वात लांब समुद्री पूल

'अटल सेतू'ची लांबी 21.80 किमी असून त्यातील 18.18 किमी भाग समुद्राच्या वर आहे. हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल आहे. वेगवेगळ्या गर्डर्सना एकत्र बसवून या पूलाची बांधणी करण्यात आली आहे. हे गर्डर विविध प्रकारचे असतात. काही स्टील तर काही सिमेट कॉंक्रीटचे बनलेले असतात. सिमेंट काँक्रीटचे गर्डर 'बॉक्स' प्रकारचे असतात. त्यामुळे ते आतून पोकळ असतात. पुलावरील पावसाचे पाणी, विद्युत दिवे आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी यामध्ये चॅनेल बसवलेले असतात. आता त्यात ऑप्टिकल फायबर नेटवर्क देखील बसवण्यात येणार आहे. यासाठी, हा पूल बांधणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक टेंडर जाहीर केला आहे. 

हे ही वाचा: सुंदर मुलीकडून मिळायची 'ती' ऑफर! लोक हॉटेलमध्ये यायचे आणि मग वकील, पोलीस...

MMRDA च्या टेंडरमध्ये नेमकं काय आहे? 

टेंडरअंतर्गत, संबंधित कंत्राटदाराला अटल सेतूच्या गर्डरखाली 50 मिमी जाडीचे दोन ऑप्टिकल फायबर चॅनेल बसवण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स मिळेल. याच आधारे अटल सेतूवरील चालकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. चालकांनी वापरलेल्या इंटरनेटद्वारे कंत्राटदाराला महसूल मिळेल. त्या बदल्यात एमएमआरडीए (MMRDA) कंत्राटदाराकडून भाडे आकारेल. हा करार पाच वर्षांसाठी असेल. तसेच, यासंदर्भात करार झाल्यानंतर, कंत्राटदाराला 60  दिवसांच्या आत हे नेटवर्क स्थापित करणं अनिवार्य असेल.

हे ही वाचा: 20 वर्षांचा संसार, 4 मुलं, तरी पत्नीने 'असं' केलं! 16 वर्षे लहान तरुणासोबत अनैतिक संबंध अन् थेट...

या कराराद्वारे मिळणारा महसूल अटल सेतूच्या बांधकामावर किंवा पुलाच्या दैनंदिन देखभाल तसेच दुरुस्तीसाठी एमएमआरडीएने केलेल्या खर्चाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल. तसेच, टेक्निकल सुविधांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे हे मॉडेल इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मार्गदर्शक तत्व ठरेल.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp