सुंदर मुलीकडून मिळायची 'ती' ऑफर! लोक हॉटेलमध्ये यायचे आणि मग वकील, पोलीस...

मुंबई तक

सध्याच्या हनीट्रॅपच्या प्रकरणांमध्ये तिसरी व्यक्ती आल्यानंतर त्यात मोठा ट्विस्ट येतो. अशा प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांबद्दल जाणून घ्या.

ADVERTISEMENT

सुंदर मुलीकडून मिळायची 'ती' ऑफर! लोक हॉटेलमध्ये यायचे आणि...
सुंदर मुलीकडून मिळायची 'ती' ऑफर! लोक हॉटेलमध्ये यायचे आणि...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ

point

सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये उकळले...

Crime News: एक सुंदर मुलगी आपल्या सौंदर्याने तरुणांना तसेच व्यवसायिकांना आपल्या जाळ्यात ओढते आणि संबंध बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत असल्याच्या घटना बऱ्याचदा ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दिल्लीतील शहरांमध्ये तर हे सामान्य प्रकरण बनले आहे. परंतु, अशा हनीट्रॅपच्या प्रकरणांमध्ये तिसरी व्यक्ती आल्यानंतर त्यात मोठा ट्विस्ट येतो. अशा प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांबद्दल जाणून घ्या. 

बलात्काराच्या आरोपाखाली अडकवणं

सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात फसून बऱ्याचजणांचा आयुष्य उद्धवस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मुली प्रथम मोठमोठ्या उद्योगपतींना आणि तरुणांना आपल्या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांच्याशी संबंध बनवतात. तसेच, यात वकील आणि पोलिसांचा देखील समावेश असतो. यामुळे पीडित व्यक्तीला संबंधित मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अडकवलं जातं आणि त्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जाते. 

लाखो रुपये उकळले जातात

अखेर पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. संबंधित वकील संपूर्ण प्रकरण अगदी सेट करतात मात्र, यातून पीडित तरुण किंवा उद्योगपतीकडून लाखो रुपये उकळले जातात. यामध्ये संबंधित तरुण किंवा उद्योगपतीच अडकला जातो. 

हे ही वाचा: 20 वर्षांचा संसार, 4 मुलं, तरी पत्नीने 'असं' केलं! 16 वर्षे लहान तरुणासोबत अनैतिक संबंध अन् थेट...

फोन करून फ्रेंडशिपची ऑफर 

काही दिवसांपूर्वी, चौहान बांगर येथील एका 29 वर्षीय व्यावसायिकाने 'एक जोडपे त्यांच्या फर्निचर दुकानात तीन-चार वेळा आले होते आणि त्यावेळी त्यांनी त्या तरुणाचा म्हणजेच त्या व्यवसायिकाचा फोन नंबर देखील घेतला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर, काही दिवसांनी त्या तरुणाच्या मोबाईलवर एका अनोळखी मुलीचा मेसेज आला. त्यावेळी तिने तिचे नाव सांगितले आणि ती ब्युटी पार्लर चालवत असल्याचं सांगितलं. त्या मुलीने व्यावसायिकाला मैत्री म्हणजेच फ्रेंडशिपची ऑफर दिली आणि ती रोज त्याच्याशी बोलू लागली. 

तपासात आलं समोर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकरणांतील पीडित तरुणांनी शाहदरा जिल्ह्यातील उच्च अधिकाऱ्यांकडे बलात्काराच्या नावाखाली खंडणी वसूल केल्याची तक्रार देखील केली होती. नंतर हा तपास जिल्ह्यातील पब्लिक ग्रीवांस म्हणजेच सार्वजनिक तक्रार (PG) सेलकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी तपास करताना आरोपी महिला आणि पीडित व्यक्तींमधील व्हॉट्सअॅप चॅट्स, कॉल डिटेल रेकॉर्ड तसेच हॉटेल आणि पोलिस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले.

हे ही वाचा: पत्नीचा जडला मेहुण्यावर जीव, प्रियकराच्या मदतीने पतीला दिला विजेचा झटका, खरं कारण लपवण्यासाठी रचला कट

तपासानंतर सेक्सटॉर्शन टीमकडून हे सगळं रचण्यात आलं आणि त्याप्रमाणे तरुण अडकले गेल्याची पुष्टी करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टीममध्ये वकील आणि काही मुलींचा समावेश आहे. ही टीम व्यावसायिकांना फसवतात आणि खंडणीचा वसूल करण्याचा व्यवसाय करतात. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp