आरोपीने 8 वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मृतदेह पिठाच्या डब्यात भरला अन् ... अंगावर काटा आणणारी घटना

मुंबई तक

28 Mar 2026 (अपडेटेड: 28 Mar 2026, 05:18 PM)

crime news : निष्पाप मुलीची हत्या करून तिचा मृतदेह पिठाच्या डब्यात कोंबून ठेवला. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. निष्पाप मृत मुलीचे वय अवघे 8 वर्षे होते, या हत्येमागील कारण नेमकं काय ते समोर आलं.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनीलने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला

point

पिठाच्या डब्यात मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह

Crime News : एका निष्पाप मुलीची हत्या करून तिचा मृतदेह पिठाच्या डब्यात कोंबून ठेवला. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ही घटना आग्रा येथील असून संबंधित निष्पाप मृत मुलीचे नाव प्रज्ञा (वय 8) असे होते. तर हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सुनील असे होते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना 24 मार्च रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

सुनीलने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला

मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी सुनील हा घटनास्थळावरून फरार झाला आणि त्याच्या अटकेसाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलिसांनी बारा पथके घटनास्थळी दाखल केले आणि शोध घेतला. त्याचदरम्यान आरोपी सुनील हा घटनास्थळावरून पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अनेकदा थांबण्याचा इशारा करताच, त्याने पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले, तेव्हा सुनीलने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला असता, नंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा : मित्रांसह भावाशी संबंध ठेवण्यास टाकला दबाव, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन... पीडितेनं सांगितला घटनेचा थरार

पिठाच्या डब्यात मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह

प्राथमिक तपासातून असे समोर आले की,  आरोपी सुनील, हा गेल्या वर्षांपासून त्याच घरात भाडेतत्त्वार राहत होता, तो मुलीचा शोध घेत असल्याचा बहाणा करत होता. याच संशयावरून पोलिसांनी सुनीलच्या खोलीची झडती घेतली. त्या तपासादरम्यान, एका पिठाच्या डब्यात मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न  आढळून आला. मुलीच्या मानेवर खोलवर जखमा झाल्या होत्या. संबंधित प्रकरणात सुनीलसोबत इतर कोणी सामिल होते का, याचा पोलीस पुढील तपास करत आहेत.