50 वर्षीय पुरुषाचे 40 वर्षीय महिलेशी होते प्रेमसंबंध, दोघेही दारू पित असताना वाद झाला, असं काय घडलं पुरुषाने मुंडकंच छाटलं

Crime news : पुरुषाचे आणि एका महिलेशी प्रेमसंबंध सुरु होते. महिला परपुरुषासोबत दारू प्यायची हे तिच्या बॉयफ्रेडला आवडलं नाही. हाच राग डोक्यात ठेवून बॉयफ्रेंडने महिलेचा खून केला, नेमकं प्रकरण काय समजून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:50 PM • 09 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुरुषाचे आणि महिलेशी प्रेमसंबंध

point

'त्या' कारणावरून पुरुषाने महिलेचं मुंडकंच छाटलं

Crime news : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरुषाचे आणि एका महिलेशी प्रेमसंबंध सुरु होते. महिला परपुरुषासोबत दारू प्यायची हे तिच्या बॉयफ्रेडला आवडलं नाही. हाच राग डोक्यात ठेवून बॉयफ्रेंडने महिलेचा खून केला. त्याने तिचं मुंडकं छाटून एका झाडीत फेकून दिलं. या एकूण घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहे. आरोपीचं नाव मनोज मास्टर (वय 50) आणि पत्नीचं नाव अनिता (वय 40) असे आहे. या प्रकरणाचा 4 ऑक्टोबर रोजी खुलासा झाला, अशी माहिती युपी तक या माध्यमाने दिली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं! दोघेही एकत्र दारू प्यायले, नंतर वाद झाला, गर्लफ्रेंडची सटकली आणि बॉयफ्रेंडलाच...

या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत संबंधित मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला. एकूण तपासानंतर, महिलेची अनिता अशी ओळख झाली. ती दौराला पोलीस ठाणे परिसरातील सारस्व येथील रहिवाशी दार सिंहची पत्नी होती. या प्रकरणात माहिती दिलेल्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणात लक्ष घालून प्रकरण हातळत आहेत. पोलिसांनी आरोपी मनोज मास्टर यालाही अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकू जप्त केला आहे. 

आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा 

पोलीस चौकीत आरोपी मनोज मास्टरने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. मनोजने सांगितलं की, सुमारे 6-7 वर्षांपूर्वी तो एका खासगी शळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता आणि घरी मुलांची शिकवणी घ्यायचा. त्याचवेळी त्याची ओळख मृत महिला अनिताची बहीण सरिताशी झाली होती. तिची मुलं मनोज मास्तरांकडे शिकवणीसाठी यायची. मनोजची हत्या 8 वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर मनोज आणि आनिता एकमेकांसोबत बोलू लागले होते. त्याने अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. तिनं अनेकदा परुपुरूषांसोबत दारू देखील प्यायली होती. मनोजला आनिताचं कुठेतरी बाहेर लफडं असल्याचा संशय बळावला, अशातच दोघांमध्ये वाद झाला. 

हे ही वाचा : नवरा होता शारीरिकदृष्ट्या कमजोर, दीराकडून शरीरसुखाची मागणी, महिलेनं विरोध करताच हुंडा अन्... भयंकर कांड समोर

अनिताच्या गळ्यावर चाकूने वार करत मुंडकं छाटलं 

ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ते एका झुडुपात दोघेही दारू पित होते. व्यसनाच्या धुंदीत दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. तेव्हा रागाच्या भरात अनितावर चाकूने वार केले. त्यानंतर तिचं मुंडकंच छाटून एका झाडीत फेकून दिलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक करत हत्यार जप्त केले. 
 

    follow whatsapp