Crime News : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे. सहा मुलांच्या आईने उन्नाव जिल्ह्यात केलेल्या कृत्याची एकच चर्चा आहे. सहा मुलांची आई शहजादीने आपल्या पतीचा कोणताही विचार न करता भाच्यासोबत पळून गेली. अशातच आता तिच्या पतीने लहान मुलांना सोबत घेत पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले आहेत. पोलिसांनी पीडित पतीला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : हगवणेंसारखेच प्रताप, प्रत्येक वादात त्याचं नाव, कोण आहे निलेश चव्हाण?
नेमकं काय होतं प्रकरण?
उन्नाव जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील ही घटना आहे. पती हसीन अहमद नावाच्या एका व्यक्तीला 6 मुलं आहेत. रोजगारासाठी तो टेम्पो चालक म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या 5 मुली आणि एका मुलाला आपल्यासोबत घेतलं आणि थेट पोलीस ठाणे गाठलं. अशावेळी पती हसीनचे रडून रडून डोळे पाणावले होते.
हसीनने आरोप केला की, 43 वर्षीय पत्नी शहजादी एका (वय 22) असणाऱ्या भाच्यासोबत पळून गेली. हसीनच्या म्हणण्यानुसार, त्याचा भाचा बिठूर ठाणे परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी बिठूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात सीओ सदर सोनम सिंह यांनी सांगितलं की, हसीन अहमदने तक्रार दाखल करत तिच्या पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने लिहिलं की, हसीन अहमद नावाच्या एका व्यक्तीने 4 मे रोजी त्यांची पत्नी भाच्यासोबत घरात ठेवलेले दागिने घेऊन पळून गेली.
हेही वाचा : दारूड्या नवऱ्याला मारण्याचा कट रचला, प्रियकरानं दिली साथ, पण काही दिवसांनी नवरा घरी आल्यानं...
या प्रकरणात आता पोलीस पीडित पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पुढील तपास करत आहेत. या प्रकरणांमध्ये तपासातून आणखी काही धागेदोरे सापडतात का? हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे भाचा आणि पत्नी नेमकी कुठे फरार झाले आहेत? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
