Crime news : उत्तर प्रदेशातील बिदायूंमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वेश्वर साई मंदिरात पुजारी मनोज शंखधरची हत्या करण्यात आली. केवळ 48 तासांत या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. सुरुवातीला हे प्रकरण गंभीर नव्हते, पण जसजसे प्रकरण उलगडत गेले तसे प्रकरण समोर आले. नंतर तपासादरम्यान, समोर आलेले हे सत्य क्राइम थ्रिलरपेक्षाही काही कमी नाही. एसएसपी डॉ. ब्रिजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, पुजारी मनोज शंखधर यांची हत्या त्यांच्याच मोठ्या भावाच्या मेहुण्यांनी केली. हत्येमागेचं कारण अवैध प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 20 दिवसांपूर्वीच विकत घेतली थार, ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात चौघांवर काळाचा घाला
नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील तपासातून मृत पुजारी मनोजचे त्याचा मोठा भाऊ प्रदीप शर्माच्या मेहुणीशी अवैध प्रेमसंबंध होते. प्रदीप शर्माच्या पत्नीचे निधन झाले होते. मृताची धाकटी बहीण ही कुटुंबातच वास्तव्यास असायची. त्याच कालावधीत मनोजचा आपल्या मोठ्या भावाच्या मेहुणीवर जीव जडला. त्याला तिच्यासोबत विवाह करायचा होता. त्याने अनेकदा हट्टही धरला पण, कुटुंबाने त्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला.
मुलीच्या कुटुंबाने तिचा विवाह हा हिमांशु नावाच्या तरुणाशी लावून दिला होता. नंतर ती महिला मनोजच्या संपर्कात आली. याच प्रेमसंबंधामुळे हिमांशु आणि त्याच्या पत्नीत सतत खटके उडू लागले. त्याच्या पत्नीने हिमांशुविरूद्ध हुंडाबळीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. कुटुंब आणि नातेवाईकांनी ताडजोड केली, पण, पुजारी मनोज आणि त्याच्या मेहुणीसोबतचे प्रेमसंबंध तुटता तुटेनासे झाले होते.
अपमानाच्या बदल्यात 'त्यानं' भयानक कट रचला
हा सर्व घडलेला प्रकार हिमांशुने मनात साचवून ठेवत अपमानाच्या बदल्यात भयानक कट रचला. दोन मेहुणे, विशेष कुमार उर्फ छोटू आणि नितेश कुमार यांना कटामध्ये सामील केले. रचलेल्या एकूण कटाप्रमाणे ते 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नितेश पुजारीला ठरल्याप्रमाणे भेटायला गेला होता, नंतर त्यांनी एकत्रितरित्या जेवण केलं. नितेश त्याच ठिकाणी झोपला असता, त्याच मध्यरात्री 1:45 वाजेच्यासुमारास, हिमांशु त्याच्या बाईकवरून आला. त्यानंतर तिघांनी मिळून पुजारी मनोज शंखधरला ताब्यात घेत त्याची गळा दाबून हत्या केली. हा प्रकरणाला वेगळं वळण दिल्याचं भासवून, त्यांनी हत्या करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोन चांदीचे मुकुट आणि सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी घेतले. खून केल्यानंतर, तिन्ही आरोपी हिमांशूच्या घरी गेले, त्यांचे कपडे जाळले आणि डीव्हीआरही पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : पत्नीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पती मिसळायचा नशेचे पदार्थ, रात्री मित्रांना बोलावून तिच्यासोबत... तिचं आयुष्य बनलं नर्क
या खळबळजनक प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसएसपी डॉ. ब्रिजेश कुमार सिंह यांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, सर्व्हिलन्स आणि सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या चार पथकांची स्थापना केली. या प्रकरणात आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून काही वस्तू जप्त देखील केल्या आहेत.
ADVERTISEMENT











