Crime news : पती-पत्नीच्या नात्यासारखं अतुट नातं या जागात कुठेच नाही. पण आता याच नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने तरुणीशी विवाह केला आणि नंतर तिच्यासोबत रात्री घृणास्पद काम करु लागला. सर्व त्रासापासून तरुणी अक्षरक्ष: वैतागून गेली होती. पीडित महिलेची सहनशीलता संपू लागल्यानंतर आता तिनं आपल्याच नवऱ्यापासून न्यायाची मागणी केली. पतीचं नाव मोहम्मद जहांगीर खां उर्फ अब्दुल्ला असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईहून गावी चालला होता बाप, कुटुंब पाहत होतं वाट, उचक्यांचं निमित्त अन् अचानक रेल्वेतच होत्याचं नव्हतं झालं
रात्री कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि पतीने पत्नीसोबत नको तेच केलं...
महिलेचं म्हणणं होतं की, रात्री तिचा पती कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि तिला पाजले. यानंतर ती बेशुद्ध व्हायची. त्याच रात्री तिचा पती त्याच्या मित्रांना घेऊन यायचा आणि तिच्यासोबत नको त्याच गोष्टी करायचा. पीडितेनं मोहम्मद जहांगीर उर्फ अब्दुल्लावर देखील आरोप केले की, त्याच्याकडे माझे प्रायव्हेट व्हिडिओ आणि फोटो आहेत.
पीडितेचं म्हणणं आहे की, जेव्हा ती आपल्या सासरी आली तेव्हा तिला समजले की, आपला पती एक रुपयाची दमडी कमावत नव्हता. त्याला अतिरिक्त हुंडा पाहिजे होता, त्याच मुद्द्यावरून तिला सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. तिला अनेकदा मारहाण देखील करण्यात आली आणि नंतर शारिरीक त्रास देण्यात आला.
तरुणाचे मित्र रात्री घरी यायचे आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचे...
दरम्यान, तरुणाचे मित्र रात्री तिच्या घरी यायचे आणि तिला जबरदस्ती कोल्ड ड्रिंक पाजली जायची. त्यानंतर पतीचे मित्र तिच्यासोबत घाणेरडं कृत्य करू लागले होते. हा घृणास्पद प्रकार सुरु राहिला असता, विवाहितेनं या कृत्याचा विरोध केला असता, पण तिला कोणीही दाद दिली नाही.
हे ही वाचा : लोकलमध्ये हिंदी बोलणं जीवावर बेतलं, मराठी तरुणाला मराठी लोकांकडूनच मारहाण; आत्महत्येने झाला शेवट
अशातच आता तिचा पती तिला आपल्याजवळच राहण्यास सांगत आहे. तो म्हणतो की, त्याने एक भाडेतत्त्वावर दुकान घेतले आहे. पण आता, पीडिताच त्याच्याजवळ राहण्यास तयार नाही. पीडितेनं आरोप केला की, पती तिला धमकावतो आणि मोठ-मोठे मेसेज देखील करतो. तो म्हणतो की, माझ्याकडे अशा अनेक वस्तू आहेत, त्या मी व्हायरल करू शकेन. यामुळे पीडितेला संशय आला की, त्याने आपले व्हिडिओ बनवून स्वत:कडे ठेवलेत. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT











