मुंबईहून गावी चालला होता बाप, कुटुंब पाहत होतं वाट, उचक्यांचं निमित्त अन् अचानक रेल्वेतच होत्याचं नव्हतं झालं
Death Incident : मुंबईहून आपल्या घरी एक पुरुष घरी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्या, त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ट्रेनमध्ये पुरुषाला प्रवासादरम्यान 4-5 उचक्या आल्या आणि नंतर त्यांचा जीव गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फूलचंद यांना अचानकपणे रेल्वेत उचक्या
कुटुंब पाहत होते वाट
ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
Death Incident : मुंबईहून आपल्या घरी एक पुरुष घरी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्या, त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ट्रेनमध्ये पुरुषाला प्रवासादरम्यान 4-5 उचक्या आल्या आणि नंतर त्यांचा जीव गेला. प्रवाशांनी या धक्कादायक प्रकरणाची माहिती झांसी रेल्वे पोलिसांना दिली आणि रेल्वेतून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. सांगण्यात येत आहे की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यामागे पाच मुली आहे. मृत पुरुषाचे नाव फूलचंद निषाद (वय 45) असे आहे.
हे ही वाचा : लोकलमध्ये हिंदी बोलणं जीवावर बेतलं, मराठी तरुणाला मराठी लोकांकडूनच मारहाण; आत्महत्येने झाला शेवट
ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, फूलचंद निषाद हे बस्ती जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील रहिवासी होते. या प्रकरणात बलराम नावाच्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, फूलचंद हा मुंबईमध्ये लेबर इंचार्च म्हणून काम करत होते. त्यांचं सर्वकाही व्यवस्थित सुरु होते, त्यांना पाच मुली देखील आहेत.
फूलचंद्र यांना अचानकपणे उचक्या
गावाकडे सध्या शेतीच्या कामाचा हंगाम असल्याने तो मुंबईहू गावी निघाला होता. सर्व प्रवाशी हे कुशीनगर एक्सप्रेसमधील जनरल कोचमध्ये बसलेले होते. 5 किमी अंतरावर झांशी स्टेशन होते, तेव्हा फूलचंद यांना अचानकपणे उचक्या लागू लागल्या. अशातच फूलचंदचा लोकलमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.










