लोकलमध्ये हिंदी बोलणं जीवावर बेतलं, मराठी तरुणाला मराठी लोकांकडूनच मारहाण; आत्महत्येने झाला शेवट
Kalyan crime : कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात हिंदी-मराठी भाषेचा वाद सुरु असतानाच मराठी तरुणानेच आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लोकलमध्ये नेमकं काय घडलं? ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस
हिंदी-मराठी भाषेचा वाद लोकलमध्ये
मराठी तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Kalyan Crime : कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात हिंदी-मराठी भाषेचा वाद सुरु असतानाच मराठी तरुणानेच आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ट्रेनमध्ये झालेल्या याच भाषेच्या वादातून त्याचं मानसिक संतुलन बिघडून त्याने तणावाखाली येत टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अर्णव खैरे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : गावातील तरुणाशी प्रेम विवाह, कुटुंबाची तळपायाची आग मस्तकात गेली, पोटच्या पोरीला गोळ्या घालून संपवलं
लोकलमध्ये नेमकं काय घडलं?
आत्महत्या केलेला तरुण अर्णव हा मुलुंड येथे कॉलेजला जात होता, त्यावरून काही प्रवाशांशी त्याचा भाषेवरून शुल्लक वाद झाला. याच वादात चार ते पाच जणांनी अर्णवला बेदम मारहाण केली आणि नंतर मानसिक तणावात येऊ त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची एकूण माहिती अर्णवच्या वडिलांनी दिली आहे.
काय म्हणाले अर्णवचे वडील?
अर्णवचे वडील जितेंद्र खैरे म्हणाले की, ट्रेनमध्ये कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला असता, त्याने हिंदीतून समोरच्या व्यक्तीला पुढे सरकण्यास सांगितलं. तेव्हा एका प्रवाशाने थेट अर्णवच्या कानशिलात लगावली. तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? असं म्हटल्यानंतर तरुण घाबरला आणि त्याने सर्व मला सांगितलं.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षात घुसला,जीवलग मैत्रीणींचा गळा कापल्या गेल्याने मृत्यू
ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका गटाने अर्णवला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धमकी देखील दिली. अर्णवला मुलुंडला उतरायचे होते, पण यात परिस्थितीत तो ठाण्यात उतरला त्याला आणखी वाद घालायचा नव्हता, असे त्यामागील कारण असल्याचं वडिलांनी सांगितलं. याच भाषेवरून वाद होऊ नयेत, असं वडील जितेंद्र खैरे म्हणालेत. जितेंद्र खैरे यांनी या प्रकरणाची कोळसेवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.










