गावातील तरुणाशी प्रेम विवाह, कुटुंबाची तळपायाची आग मस्तकात गेली, पोटच्या पोरीला गोळ्या घालून संपवलं

मुंबई तक

Crime News : नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. एका सपना नावाच्या विवाहितेवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना आहे. हल्लेखोर दुसरे तिसरे कोणीही नसून सपनाचेच माहेरकडील लोक असल्याचा गंभीर आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा

point

पोटच्या पोरीला गोळ्या घालून संपवलं

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. एका सपना नावाच्या विवाहितेवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना आहे. हल्लेखोर दुसरे तिसरे कोणीही नसून सपनाचेच माहेरकडील लोक असल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना हरियाणा राज्यातील रोहतकमध्ये घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. या मन हेलावणाऱ्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : बुध ग्रहाचा उदय, काही राशींचे बदलणार नशीब, नुसताच पडणार पैशांचा पाऊस

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणात जेव्हा सपनावर गोळीबार करण्यात आला तेव्हा ती तिचा पती सुरज हा घरातच नव्हता. जेव्हा गोळीबार करण्यात आला, त्याच गोळीबारात सपनाचा दीर साहिल गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सपनाला वाचण्यासाठी पुढे सरसावलेल्या साहिलला गोळी लागली. अशातच साहिल गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला पीजी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, सपनाने त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता, तेव्हा तिच्या कुटुंबाला तिचा प्रचंड राग आला आणि याच रागातून ही धक्कादायक घटना घडली. संबंधित प्रकरणात घटनेची माहिती मिळताच, रोहतक पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करताना दिसत आहेत. 

हे ही वाचा : सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा, शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

सैराटची पुनरावृत्ती 

या घटनेला सैराटची पुनरावृ्त्ती असल्याचे बोललं जात आहे. सपना आणि तरुणाचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधातून त्यांनी विवाह केला. याचाच सपनाच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचं सांगण्यात येत होते. याच रागातून सपनाच्या कुटुंबीयांनी गोळीबार केला. तेव्हा सासरच्या घरी तिचा पती नसल्याने पती सुदैवाने वाचला, पण गोळीबारात सपनाची हत्या केली. एका क्षणार्धात लेकीसह तिच्या पतीच्या संसाराची राखरांगोळी झाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp