बुध ग्रहाचा उदय, काही राशींचे बदलणार नशीब, नुसताच पडणार पैशांचा पाऊस
Astrology : बुध ग्रहाच्या उदयाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम नेमका कसा होणार आहे ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

1/5
बुध ग्रहाचा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उदय झाला. याचपार्श्वभूमीवर ग्रहांच्या उदय आणि अस्ताचा जीवनावर खोलवर परिणाम होतो. याचा काही राशींसाठी होणारा बदल अगदी शुभमय मानला जातो. तसेच ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा ग्रह म्हणून बुधकडे पाहिलं जात. त्याच बुध ग्रहाने ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या राशीत प्रवेश केला आणि नंतर तो कन्या राशीत उदय पावेल.

2/5
ही खगोलीय घटना काही राशींसाठी भाग्याची संधी निर्माण करणारी आहे. या एकूण राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात राशी नेमक्या कोणत्या आणि त्याचा नेमका परिमाण काय होईल.

3/5
वृषभ राशी :
वृषभ राशीच्या लोकांसाठी, बुध ग्रहाच्या उदयामुळे संपत्ती आणि समृद्धीने दरवाजे उघडतील. तसेच बुध ग्रहाच्या दुसऱ्या भावात उदया पावेल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्याचप्रमाणे अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. आपले बोलणं अधिकच आकर्षित होईल, जे तुमच्या कल्पनांनी लोकांना प्रभावित करेल.

4/5
मकर राशी :
बुध ग्रहाचा उदय हा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. बुध ग्रह हा तुमच्या नवव्या घरात उगवेल, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळेल. तसेच काही खोळंबलेली कामे आहेत ती पूर्ण होतील.

5/5
मीन राशी :
बुध राशीचा उदय मीन राशीसाठी विशेषतः शुभ राहील. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीच्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल. या काळात मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी आहे. अनेपेक्षित अर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.









