Sexually Abused : देशात आजही महिला आणि मुलींवरील अन्याय अत्याचाराच्या घडना घडताना दिसत आहे. काही नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेवर दोघांनी गँगरेप करत नंतर तिला बेदम मारहाण केली. नराधम इथवरच न थांबता त्यांनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बॉटल टाकली. त्यानंतर तिला एका रस्त्यावर सोडण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वहिनीला आवडायचा दीर, पतीला बंद केलं एका खोलीत, नंतर दीरासोबतच... भयंकर कांड
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत
रस्त्यावर बेवारसपणे बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन पीडित मुलगी पडली होती. तेव्हा एकाने तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांनी बोलावले. बांसवाडा येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या तिची प्रकृती ही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींपैकी एक आरोपी हा पीडितेच्या शाळेतील माजी विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.
रात्री दारू पिऊन बलात्कार आणि बेदम मारहाण
पीडित मुलगी ही 20 ऑगस्ट रोजी सकाळी शाळेत जात होती. शाळेतून घरी परतत असताना ऑटो रिक्षाची वाट पाहत होती. त्यानंतर तरुण दुचाकीवरून आले असता, त्यातील एक तरुण तिच्या शाळेचा माजी विद्यार्थी होता, त्याने दुचाकीवरून घरी सोडतो असे आमिष दाखवले असता, तरुणीने नकार दिला. त्यानंतर दोन्ही तरुणाने पीडितेला उचललं, एका घरात नेले आणि तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर आरोपींपैकी एकाने तिला त्याच्या मावशीच्या घरी नेले. रात्री दारू पिऊन दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार करत बेदम मारहाण केली.
तिच्यावर उदयपूरच्या एमबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर दुसरीकडे पीडितेच्या आईने उदयपूर रेंज आयजी गौरव श्रीवास्तव यांच्यासमोर स्वत:ला हजर राहून तिच्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिने आयजी श्रीवास्तव यांच्याकडे आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.
हे ही वाचा : लिव्ह-इन पार्टरने तरुणाशी तोडले संबंध, नंतर दुसराच आवडू लागला, तरुणाची सटकली अन् तरुणीवर पेट्रोल ओतून जाळलं
संबंधित प्रकरणात खासदार डॉ. मन्नालाल रावत यांनी सोमवारी आयजीशी चर्चा केली आणि रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीची तिच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच दोन्ही नराधमांवर अटक करण्यास त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
