Crime News : नात्यात जर पैसा आला तर होत्याचं नव्हतं होतं, असे अनेकदा अनुभवलंही असेल. याच पैशांच्या व्यवहारामुळे अनेकदा वाद होतात, ते वाद विकोपाला जातात आणि होत्याचं नव्हतं होतं, अशीच एका घटना आता उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये पैशांवरून झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून दोन्ही भावांवर चाकूने सपासप वार केले आहेत. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण या हल्ल्याच वाचला असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : हसावं की रडावं? पत्नीने आपल्याच पतीच्या जीभेचा चावा घेतला, थक्क करणारं कारण समोर आलं
काकाने पुतण्यावर केले सपावर वार
उत्तर प्रदेशातील कटवन गावात एका व्यक्तीने दोन्ही भावांवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. तसेच ज्या तरुणावर वार करण्यात आले, त्याच्या मोठ्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असल्याचे वृत्त आहे. कुडवार पोलीस ठाण्याचे एसएचओ अमित मिश्रा यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्रीच्या वेळी थकबाकीची रक्कम घेण्यासाठी संजय निषाद (24) आणि मोठा भाऊ विजय कुमार निषाद (30) हे त्यांचे काका फागुलालच्या घरी गेले होते. तेव्हा पैशांच्या वादातून दोन्ही भावांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या वादात कुमार निषादचा मृत्यू झाला.
दोन्ही भावांचा त्यांच्या काकांसोबत पैशांवरून वाद झाला होता. त्यांच्यातील वादानंतर दोन्ही भावांवर चाकूने सपासप वार करत हल्ला केला. या हल्ल्यामुळे दोन्ही भाऊ जखमी झाले. या संबंधित घटनेनंतर जखमी झालेल्या संजयला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर वेळ निघून गेला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर विजय कुमार हा गंभीर अवस्थेत होता.
हेही वाचा : भयंकर! नातेवाईकांनीच विधवा महिलेची 'एवढ्या' लाखांना केली विक्री, मुलंही होती बेपत्ता
दरम्यान, पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. सर्व आरोपी पीडितेचे कुटुंब आणि नातेवाईक आहेत. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेऊन त्यांना लवकरच ताब्यात घेणार आहे.
ADVERTISEMENT
