तरुण गर्लफ्रेंडला भेटायला गावात आला, ग्रामस्थांनी विजेच्या खांबाला बांधून उघडा करून मारला

मुंबई तक

• 03:46 PM • 29 Mar 2026

crime news : गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या एका प्रियकराला तिच्या कुटुंबीयांनी विजेच्या खांबाला बांधले आणि नंतर त्याची निर्घृणपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ घटना घडल्याच्या काही दिवसानंतर व्हायरल करण्यात आला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाच्या खांब्याला बांधून केली मारहाण

point

मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड

Crime News : गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या एका प्रियकराला तिच्या कुटुंबीयांनी विजेच्या खांबाला बांधले आणि नंतर त्याची निर्घृणपणे मारहाण केली. घटनेच्या तीन दिवसानंतर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरणात वडिलांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीच्या बाजूने दोन आरोपींना अटक केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील पिलभीत येथील बरखेडा पोलीस ठाणे परिसरात घडल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीचा मर्डर केल्याने वडील तुरुंगात; ज्याच्याकडे आश्रयासाठी गेली त्या मामानेच केला भाचीवर बलात्कार

तरुणाला खांब्याला बांधून केली मारहाण

घडलेल्या घटनेनुसार, पोलीस ठाणे परिसरात पौटा कला गावचा रहिवासी असलेला आरिफ खमारियाला गावातील काही लोकांनी वि‍जेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली. पीडित मुलाचे वडील, शफीक शाह यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी  बाहेर पडला, त्यादरम्यान काही लोकांनी त्याला वाटेतच अडवून एका खांबाला बांधून लाथा, ठोसे आणि काठ्यांनी मारहाण केली. 

मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

संबंधित तरुण हा घटनास्थळावरून कसाबसा आरोपीच्या हातातून सुटला आणि घरी पोहोचला, संबंधित प्रकरणात कुटुंबीयांनी घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांच्या मते हे प्रकरण प्रेमप्रकरणातून घडलं असावं. या प्रकरणात आरोप करण्यात आला की, तो तरुण ओळखीच्या मुलीला भेटण्यासाठी गेले आणि मुलीच्या कुटुंबीयांना पकडून मारहाण केली. त्यादरम्यान तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : डॉक्टरने चोरुन काढले नर्सचे आक्षेपार्ह फोटो अन् त्यानंतर तब्बल तीन वर्ष नर्ससोबत घडलं भयानक

कुटुंबियांनी शुक्रवारी रात्री उशिरा बरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्याच आधारे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास  करत आहेत.