वॉर्ड बॉयनं बाथरुममधून इशारा करत केलं वाईट कृत्य नंतर... महिला रुग्णाने 'त्या' रात्रीचा सांगितला घटनाक्रम

मुंबई तक

• 01:12 PM • 08 Jun 2025

Crime News : जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या महिला रुग्णाने वॉर्ड बॉयवरती धक्कादायक आरोप केले आहेत. वॉर्ड बॉयने बाथरुममधून मला इशारे करत शरीरावर स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

crime news ward boy commits a bad act while beckoning from the bathroom

crime news ward boy commits a bad act while beckoning from the bathroom

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या महिला रुग्णाचा वॉर्डबॉयवरती गंभीर आरोप

point

आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन

Crime News : उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या महिला रुग्णाने वॉर्ड बॉयवरती धक्कादायक आरोप केले आहेत. वॉर्ड बॉयने बाथरुममधून मला इशारे करत शरीरावर स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?

नेमकं घडलं काय? 

संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चांदौली जिल्हा मुख्यालयातील पंडित कमलापती त्रिपाठी संयुक्त जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एका मुलीवर उपचार सुरू होते. यावेळी पीडित रुग्णाने वॉर्ड बॉयवर अत्याचार केल्याचा आरोप केला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. एसपी सिंह तात्काळ वॉर्डमध्ये पोहोचले. त्यांनी पीडित आणि तिच्या कुटुंबियांशी सविस्तर चर्चा करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं. 

पीडित महिला रुग्णाने रुग्णालयातील वॉर्ड बॉयवरती धक्कादायक आरोप केले असून पीडितेनं सांगितले की, "आम्ही रात्री झोपलो असताना, एका तरुणाने बाथरुममधून इशारा करत हाक मारत इशारा केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती झोपी गेली असताना तो मुलगा तिच्याकडे आला आणि तिच्या शरीरावर वाईट स्पर्श करु लागला, पीडितेनं स्पष्टपणे सांगितलं की, त्याने माझ्यासोबत वाईट कृत्य केलं. 

संबंधित प्रकरणात आता पंडित कमलापती त्रिपाठी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एसपी सिंह यांनी प्रतक्रिया दिली आहे. पीडित तरुणी रुग्णालयातील कर्माचाऱ्याने गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. ते पुढे म्हणाले की, हे कळताच मी घटनास्थळी चौकशी केली आणि या संदर्भात जे प्रकरण दिसून आले त्याची चौकशी केला जात आहे. 

हेही वाचा : त्रिग्रही योग 2025 : 15 जूननंतर त्रिग्रही योग होणार सुरू, 'या' राशीचे लोक खोऱ्याने ओढणार पैसा

दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाणार असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिला रुग्णांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.