घरात बायको दुसऱ्या पुरुषासोबत, नवऱ्याने पकडलं पण स्वत:चे दोन्ही डोळे गमावले!

Crime News : फास्ट ट्रॅक कोर्टाने पतीच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला कायमचे अंध करणाऱ्या कहकशां नावाच्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा आणि १.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 06:55 AM • 07 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरात बायको दुसऱ्या पुरुषासोबत,

point

नवऱ्याने पकडलं पण स्वत:चे दोन्ही डोळे गमावले!

Crime News : फास्ट ट्रॅक कोर्टाने एका अत्यंत क्रूर घटनेत पतीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुजफ्फर अली असे पीडित पतीचे नाव असून, त्याच्या पत्नीने अनैतिक प्रेमसंबंधांना विरोध केल्याचा राग मनात धरून झोपेत असलेल्या मुजफ्फरच्या अंगावर  ॲसिड ओतले होते. या अमानवीय हल्ल्यात मुजफ्फर अली 60  टक्के भाजला होता आणि उपचारादरम्यान त्याला कायमचे अंधत्व आले. या खळबळजनक प्रकरणाची दखल घेत कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे वाचलं का?

आक्षेपार्ह स्थिती पकडल्याने पत्नीने पतीवर फेकले अॅसिड 

मुजफ्फर आणि कहकशां यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र नंतर कहकशांचे शेजारील तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. 7 मार्च 2025 रोजी मुजफ्फरने तिला आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते, ज्याचा त्याने तीव्र विरोध केला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी कहकशांने मुजफ्फर गाढ झोपेत असताना त्याच्या अंगावर ॲसिड फेकले. त्यानंतर मुजफ्फरला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात सहा महिने मृत्यूशी झुंज द्यावी लागली. त्याची जीव वाचला असला, तरी ॲसिडमुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमची गेली आहे.

न्यायालयातच रडू लागली, पण कठोर शिक्षा मिळाली 

सोमवारी जेव्हा कोर्टाने निकाल सुनावला, तेव्हा दोषी पत्नी कहकशांला अश्रू अनावर झाले आणि ती न्यायालयातच रडू लागली. दुसरीकडे, संसर्ग टाळण्यासाठी चेहऱ्यावर कापड बांधून आपल्या आईच्या आधाराने न्याय मिळवण्यासाठी पोहोचलेल्या मुजफ्फर अलीला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. हायकोर्टाच्या देखरेखीखाली आणि संभल पोलिसांच्या भक्कम पुराव्यांच्या आधारे, फास्ट ट्रॅक कोर्टाने अवघ्या दहा सुनावण्यांमध्ये हे ऐतिहासिक न्यायदान करत न्याय मिळवून दिला आहे.

अपर जिल्हा न्यायाधीश गोपाल यांनी ही शिक्षा सुनावताना या गुन्ह्यातील क्रूरता लक्षात घेतली. समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना थारा मिळू नये, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पत्नीला झालेली ही जन्मठेपेची शिक्षा आणि दंड यामुळे पीडित मुजफ्फर अलीला न्याय मिळाला असून, कायद्याने आपली कठोरता सिद्ध केली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात असून, पीडिताची अवस्था पाहून उपस्थितांचे हृदय हेलावले होते.