जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच..., नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 12:54 PM • 06 Jun 2026

जनगणना कर्तव्यावर असलेल्या एका 45 वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच...,

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका मुख्याध्यापकाने जनगणना कर्तव्यावर असलेल्या आपल्या शिक्षिका पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने केवळ हत्याच केली नाही, तर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतःच पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून या हत्याकांडाचा यशस्वी उलगडा केला. गुजरातच्या अहमदाबादमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

जनगणनेसाठी बाहेर पडली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील रहिवासी असलेले हे शिक्षक पती-पत्नी बुधवारी (2 जून) सकाळी एकत्रच जनगणनेच्या कामासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, वाटेतच महिला संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे सांगत पतीने पोलिसात तक्रार दिली. त्याच दिवशी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. तपासादरम्यान या मृत महिलेची ओळख प्राथमिक शाळेतील 45 वर्षीय शिक्षिका रीना जाला अशी पटली.

हे ही वाचा : खून करुन जंगलात जाळली बॉडी, दहावीत शिकणाऱ्या राधिकाला का संपवलं?

रस्त्यातच वाद झाला

एका वृत्तानुसार, मृत रीना यांचे पती बलदेव हे एका सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बलदेव आणि रीना बुधवारी जनगणनेसाठी दुचाकीवरुन निघाले होते. वाटेत त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या बलदेवने स्कूटी कालव्याजवळील एका निर्जन रस्त्याकडे वळवली आणि तिथे रीना यांच्या डोक्यात दगडाने प्रहार करून त्यांची हत्या केली. यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याने स्वतःच्या स्कूटीमधून पेट्रोल काढले, ते रीना यांच्या मृतदेहावर शिंपडले आणि मृतदेह पेटवून दिला. हा भयानक गुन्हा केल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचला.

हे ही वाचा : IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?

'या' कारणामुळे केली हत्या

दरम्यान कालव्याच्या कडेला एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह स्थानिक शेतकऱ्याला दिसला, ज्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक पुरावे गोळा करुन त्यांच्या आधारे बलदेवची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने कौटुंबिक वादामुळे आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.