IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?

मुंबई तक

• 09:06 AM • 06 Jun 2026

अगदी व्यवस्थित रचलेल्या प्लॅननुसार तो बुरखा घालून आला. मित्राची हत्या केली अन् निघून गेला. त्याला वाटलं आपण सापडणार नाही. मात्र 'त्या' एका चुकीमुळे तो अडकला. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव,

point

'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 31 मे रोजी रात्री कॉम्प्युटर कोचिंग चालक प्रकाश चंद्र गुप्ता यांची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रकाश चंद्र क्रिकेटचे शौकीन होते आणि आयपीएल फायनलच्या दिवशी त्यांनी मॅच बघून कोचिंग सेंटरमध्येच झोपणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 लाख रुपयांची सोन्याची साखळी व हातातील ब्रेसलेट गायब होते. सुरुवातीला पोलिसांना हा मृत्यू अपघात वाटला, पण मौल्यवान दागिने गायब असल्याने पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

हे वाचलं का?

बुरखा घातलेली व्यक्ती कोण?

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान, पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोचिंग सेंटरजवळून बुरखा घालून जाणारी एक संशयास्पद महिला दिसली. त्या महिलेची चाल आणि देहबोली स्त्रियांसारखी वाटत नसल्याने पोलीस आयुक्तांना संशय आला. त्यांनी त्या बुरखाधारी व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली असता, ती व्यक्ती एका कारमधून उतरल्याचे समोर आले. अधिक तपासात ती कार आणि बुरखा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मृत प्रकाश चंद्र यांचा 18 वर्षांपासूनचा जिवलग मित्र मोहित द्विवेदी असल्याचे उघड झाले.

हे ही वाचा : सेंटर पॉईंट: 'लाला, रिस्क है तो इश्क है..!', ही Inside स्टोरी एकदा वाचाच.. पार चक्रावून जाल!

युट्यूबवरील व्हिडिओ पाहून रचला कट

पोलिसांनी संशयित मोहितला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोहित स्वतः देखील आधी कोचिंग चालवत होता, मात्र ते बंद झाल्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. काही दिवसांपूर्वी प्रकाश यांच्यासोबत खजुराहो येथे फिरायला गेला असताना, प्रकाशने त्याला आपली 5 लाख रुपयांची सोन्याची साखळी दाखवली होती. तेव्हापासून मोहितची नजर त्या साखळीवर होती. त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ पाहून हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने बाजारातून खास बुरखा आणि चप्पल खरेदी केली होती.

हे ही वाचा : बीड : तलाठ्याच्या बायकोचे अनैतिक संबंध, लग्नाच्या 12 दिवसानंतर आयुष्याचा शेवट

'त्या' रात्री काय घडलं?

31 मे रोजी रात्री मोहित कारने घटनास्थळी पोहोचला आणि कारमध्येच बुर्खा परिधान करून त्याने प्रकाशच्या खोलीत प्रवेश केला. दारूच्या नशेत असलेल्या प्रकाशकडून दागिने हिसकावताना झालेल्या झटापटीत प्रकाश जमिनीवर पडला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पकडले जाऊ नये म्हणून मोहित दुसऱ्या दिवशी स्वतः पीडित कुटुंबासोबत राहून पोलिसांशी चर्चा करत होता आणि नंतर एका मैत्रिणीला परीक्षेसाठी लखनऊला घेऊन गेला होता. या घटनेमुळे मृत प्रकाश यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, 18 वर्षांच्या मैत्रीचा असा भयानक अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.