परदेशातून आलेल्या बापाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, सलग तीन दिवस काय घडलं?

मुंबई तक

• 11:57 AM • 05 Jun 2026

एका नराधम बापाने आपल्या मुलीवरच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

परदेशातून आलेल्या बापाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

point

सलग तीन दिवस काय घडलं?

Crime News : दक्षिण आफ्रिकेतून दीर्घकाळानंतर मायदेशी परतलेल्या एका 42 वर्षीय नराधम बापाने स्वतःच्याच 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीला या अत्याचाराबाबत कोणासही न सांगण्याची धमकी देत जीवे मारण्याची भीती घातली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

तीन दिवस बलात्कार आणि गर्भनिरोधक गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत राहत होता आणि 2024 मध्येच तो भारतात परतला होता. पीडितेच्या आईने पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 9, 10 आणि 11 मे रोजी अशा सलग तीन दिवस नराधम बापाने घरातच मुलीवर सलग अत्याचार केले. या अमानुष कृत्यानंतर त्याने पीडित मुलीला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या आणि तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं, अन्..भयंकर घडलं!

'त्याला फाशीची शिक्षा द्या'

या भीषण मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असलेल्या पीडित मुलीने अखेर 30 मे रोजी धीर एकवटून आपल्या आईला या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने कोणतीही भीती न बाळगता थेट पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. "माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे," अशी संतप्त मागणी आईने आपल्या तक्रारीत केली आहे.

हे ही वाचा : लग्न ठरलेल्या प्रेयसीला धमकी द्यायला गेला अन् फसला, 24 वर्षीय तरुणासोबत काय झालं?

आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने  तपासचक्रं फिरवून अवघ्या काही तासांतच त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीची रवानगी तुरुंगात केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.