स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...

Crime News : स्वयंपाकात मदत करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून शेजारील मुलीला घरी बोलावले. मुलगी घरी आल्याबरोबर त्यांनी पीडितेची फसवणूक करत लैंगिक अत्याचार केला.

आईच्या मित्राचा मुलीवर लैंगिक अत्याचार

आईच्या मित्राचा मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई तक

• 04:14 PM • 06 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रात्रीचे जेवण बनवण्याच्या मदतीची मागणी अन् भलतंच 

point

घराचा दरवाजा बंद करून नको तेच...

Crime News : बिहारच्या नालंदा येथून दोन भावांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. स्वयंपाकात मदत करण्याच्या बहाण्याने त्या दोघांनी शेजारील एका मुलीला घरी बोलावले. मुलगी घरी आल्याबरोबर त्यांनी पीडितेची फसवणूक करत लैंगिक अत्याचार केला. हिल्सा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास केला होता. सध्या दोन्ही भाऊ हे घटनास्थळावरून फरार झाल्याचे वृत्त उघडकीस आले, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्याचे काम केले.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेड : मामाच्या गावी जाताना चिमुकला कारखाली चिरडला, आई अन् बापाच्या डोळ्यादेखत...

रात्रीचे जेवण बनवण्याच्या मदतीची मागणी अन् भलतंच 

पीडितेनं सांगितलं की, 4 जून रोजी गुरूवारी रात्री उशिरा पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या दोन भावांनी तिला घरी बोलावले. नंतर तिने सांगितलं की, शेजाऱ्याने तिला रात्रीचे जेवण बनवण्यासाठी मदतीची मागणी केली. नंतर मोठ्या भावाने पीडितेला पकडले, तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि लहान भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घराचा दरवाजा बंद करून नको तेच...

या घटनेनंतर पीडिता बराच वेळ झाली तरीही घरी पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले होते. घराचा दरवाजा देखील बंद होता. हाक मारूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही. काहीतरी भलताच प्रकार घडल्याचा संशय आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली होती. पीडितेनं माहिती दिली की, संबंधित दोघांनी मिळून पीडितेला भाजी बनवायला सांगितली. त्याचदरम्यान त्यांनी घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा : जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काय घडतंय? दीपके काय म्हणाले?

पीडितेचे वडील हे दुसऱ्याच राज्यात मजूरदार म्हणून काम करत होते. मुलगी तिच्या गावात आणि काकांसोबत राहते. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रारीच्या कारवाईस सुरूवात केली. पीडितेला वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.