अल्पवयीन मुलीच्या एकतर्फी प्रेमात झाला वेडा अन् नको तेच करुन बसला; धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

• 09:58 AM • 06 Jun 2026

एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीवर हल्ला करत क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीच्या एकतर्फी प्रेमात झाला वेडा अन् नको तेच करुन बसला

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या गळ्यात दोरीचा फास लावून तिला गच्चीवरुन लटकवले आणि नंतर खाली फेकून दिले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका गावातील आहे.

हे वाचलं का?

घरात एकटीच असताना..

ही घटना घडली तेव्हा पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती आणि तिचे कुटुंबीय शेतात गेले होते. हीच संधी साधून धर्मेंद्र परिहार नावाचा आरोपी तिच्या घरात घुसला. एकतर्फी प्रेमातून त्याच्या मनात आधीपासूनच राग होता. घरात शिरताच आरोपीने काहीही विचार न करता मुलीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी घराच्या गच्चीवर पळाली, मात्र नराधम आरोपीने तिचा पाठलाग सोडला नाही.

हे ही वाचा : IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?

गच्चीवरुन खाली फेकले

आरोपी गच्चीवर पोहोचला आणि त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा पार करत मुलीच्या गळ्यात दोरीचा फास अडकवून तिला लटकवले आणि काही वेळातच तिथून थेट खाली फेकून दिले. या संपूर्ण भयंकर घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी तातडीने ग्वाल्हेरला पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा : सेंटर पॉईंट: 'लाला, रिस्क है तो इश्क है..!', ही Inside स्टोरी एकदा वाचाच.. पार चक्रावून जाल!

आरोपीला अटक

या अमानुष घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि मुलीच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी तब्बल 5 तास रस्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि नायब तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी धर्मेंद्र परिहारला अटक केली असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या त्याच्या इतर साथीदारांचा आणि नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत.