Crime News : दिल्लीतील नरेला परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका 32 वर्षीय अभियंता दीपकने त्याची 27 वर्षीय प्रेयसी साधना सिंगसोबत केलेल्या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली. दीपक आणि साधना यांची नोएडा येथे भेट झाली होती, त्यानंतर ते एकत्र राहू लागले होते. दीपक हा नोएडातील एका कंपनीत नोकरी करत होता. तर साधना ही हरियाणातील फरिदाबाद येथे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जबरदस्त! ऑगस्टच्या सुरुवातीलाच सोनं गडगडलं, किती रुपयांनी स्वस्त झालं? गोल्ड रेट आताच तपासा
दरम्यान, अलीकडेच दीपक दिल्लीतील कोंडली येथे एका कंपनीत नोकरी करत होता. नोकरी बदलल्यानंतर तो नरेला येथील एका फ्लॅटवर राहू लागला. साधना अनेकदा त्याला भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर यायची. साधनाला कळाले की, दीपकच्या कुटुंबाने त्याला लग्नासाठी दुसरी मुलगी शोधून ठेवली होती.
साधनाने दीपकशी याच विषयी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. एकदा तर ती याच विषयावर बोलण्यासाठी दीपकच्या फ्लॅटवर गेली होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. साधनाला वाटले की दीपक तिला फसवत आहे. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, दोघेही एकमेकांवर रागावले.
रागाच्या भरातच दीपकने...
रागाच्या भरातच दीपकने साधनाला फ्लॅटच्या सहाव्या मजल्याच्या बाल्कनीतून ढकलले. तेव्हा साधना बाल्कनीतून रस्त्याच्या कडेला पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात साधनाचा मृतदेह अस्ताव्यस्त पडला होता. घटनास्थळी असलेल्या लोकांनी हे चित्र पाहून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस येईपर्यंत साधनाचा मृत्यू झाला. दरम्यान, साधनाच्या शरीरावर खुणा होत्या, तसेच तिचे कपडेही फाटले होते आणि चेहरा रक्ताने माखलेला होता.
हे ही वाचा : ऑनलाईन गेम खेळण्यावरून आजीने नातवाला फटकारले, नातवाची सटकली अन् टॉवेलनं गळा आवळून आजीला संपवलं, नंतर...
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली पोलिसांचे उपायुक्त हरेश्वर स्वामी म्हणाले की, दीपकला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भारतीय दंडसंहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीच्या दरम्यान, दीपकने सांगितलं की त्याचे साधनाशी भांडण झाले होते, परंतु तिला जाणूबुजून दीपकनेच ढकलल्याचं मान्य केलं नाही.
संबंधित प्रकरणावरील प्रश्नोत्तरे
1 प्रश्न : साधना सिंगची कोणी हत्या केली?
उत्तर : 32 वर्षीय अभियंता दीपक हत्या केली
2 प्रश्न : साधनाला कोणी बालकीनूत ढकलले?
उत्तर : 32 वर्षीय अभियंता दीपकने ढकलले होते.
ADVERTISEMENT
