Delhi Gangrape Case : दक्षिण पूर्ण दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 23 वर्षीय पीडितेला ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. नंतर तिला धर्म परिवर्तनास भाग पाडण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण कटाचा सूत्रधार फहीम नावाचा एक अवैध शस्त्र पुरवठादार आहे. पीडितेला घाबरवण्यासाठी आणि तिचे मनधौर्याचे खच्चीकरण करण्यासाठी आरोपीने तिच्यावर जनावरांचे रक्त आणि मांसाचे तुकडे फेकले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणी पोलिसांनी एफआरआय दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख फहीम असल्याची समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल
सोशल मीडियावर ओळख लपवून तरूणीला फसवून नको तेच...
संबंधित प्रकरणातील ही संपूर्ण घटना 2021 मध्ये सोशल मीडियावर उघडकीस आली होती. आरोपी फहीमने आपली ओळख लपवून आपण साहिल असल्याची माहिती समोर आली. त्याने आपण श्रीमंत असल्याचे सांगितले, नंतर पीडित तरुणीला बळीचा बकरा बनवलं. आरोपीने तिच्याशी विवाह करण्यासाठीचं वचन देखील दिलं. 2022 मध्ये आरोपीने तिला दिल्लीच्या बाटला हाऊस परिसरात भेटण्यासाठी देखील बोलावलं होतं. तिथे पोहोचल्यावर महिलेच्या लक्षात आलं की, साहिल खरं तर फहीम आहे. यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर फहीम आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
पीडितेच्या शरीराला जनावरांचं रक्त फासलं
पीडितेची अंगावर काटा आणणारी तक्रार असून पीडितेच्या म्हणण्यांनुसार, फहीम आणि त्याच्या नातेवाईक अवैध शस्त्र तस्करी करतात. आरोपींनी मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला आहे. तिला घाबरवण्यासाठी तिच्या संपूर्ण शरीराला जनावरांचे रक्त फासले, यामुळे ती पूर्णपणे ती भयभीत झाली होती. तिच्या अंगावर मांसाचे तुकडे देखील टाकले होते. यानंतर तस्लीम नावाच्या एका मैलवीने मुलीचा छळ करून तिला धर्मांतरण करण्यास भाग पाडले.
ठिकठिकाणी पीडितेवर सामूहिक अत्याचार
प्रकरणातील आरोपीची क्रूरता अनेकदा थांबली नाही, बाटला हाऊसमध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यांनी पीडितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ देखील बनवला होता, व्हिडिओचा वापर करत तिला सतत ब्लॅकमेल केलं. आरोपींनी तिला घटनास्थळावरून मेरठला नेलं आणि तिथेही सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. अशा स्थितीत पीडितेनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यास आरोपींनी तिच्या निष्पाप लहान मुलींना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी पीडितेनं 2022 ते 2024 असी दोन्ही वर्षे तिला नको अशी परिस्थिती भोगावी लागली.
दरम्यान, 2025 मध्ये गुरुग्राम पोलिसांनी मुख्य आरोपी फहीमला एका भलत्याच प्रकरणात अटक केली. पोलिसांनी फहीमचा मोबाईल जप्त केला, ज्यात पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो होते. या प्रकरणी पीडितेला खात्री देण्यात आल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो हटवण्यात आले. जेव्हा याबाबत पीडितेला माहिती दिली की, संबंधित व्हिडिओ हटवण्यात आलेत, ते लीक करता येणार नाहीत, तेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचे धाडस दाखवले होते.
हे ही वाचा : बीड : 'तु मेरे साथ शादी कर वरना..', हात धरून तरूणाचा पीडितेवर...
दक्षिण पूर्ण दिल्लीचे डीसीपी हेमंत तिवारी यांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात 14 मे 2026 रोजी जामिया नगर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केली. पीडितेनं तिच्या तक्रारीत फहीम, खुर्शीद, झैद, अझीम, तालीम आणि नफीस या पाच आरोपींनी नावे दिली आहेत. पोलिसांनी कारवाई करत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर एक आरोपी मेरठ येथे दुसऱ्याच प्रकरणात अटक आहे.
ADVERTISEMENT











