आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, पण गावाकडे जीव गेला

IT employee turned farmer dies after lightning : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे इंजिनिअरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

IT employee turned farmer dies after lightning

IT employee turned farmer dies after lightning

मुंबई तक

28 May 2026 (अपडेटेड: 28 May 2026, 09:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय

point

पण गावाकडे जीव गेला, नेमकं काय घडलं?

IT employee turned farmer dies after lightning :आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेल्या एका तरुणाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुण आपल्या पत्नी आणि मुलासोबत शेतीची पाहणी करण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 12 तास धोक्याचे! पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट

मृत तरुणाचे नाव होसोक्लू रोशन बालकृष्ण असे आहे. तो मूळचा मदिकेरीजवळील हेरावनाड गावातील रहिवासी होता. रोशन याने नुकतीच आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली होती. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यासोबत शेतीविषयक कामात सक्रिय झाला होता. आधुनिक कृषी उपकरणांची ओळख करून देणे आणि त्याचे मार्केटिंग करण्याचे काम तो करत होता. 

हेही वाचा : पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार

आंबे तोडण्यासाठी गेल्यावर दुर्घटना

रोशन आपल्या पत्नी आणि मुलासोबत येलवाल परिसरात असलेल्या शेताजवळ थांबला होता. त्यावेळी तो आंबे तोडण्यासाठी गेला असताना अचानक त्याच्यावर वीज कोसळली. या घटनेत तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाली, मात्र तिचा जीव वाचला.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रोशन याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्यावर हेरावनाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना मंगळवारी म्हैसूरजवळील येलवाल परिसरात घडली असून, मृत रोशन बालकृष्ण हे मदिकेरीजवळील हेरावनाड गावचे रहिवासी होते.

म्हैसूरमध्ये वीज पडून आणखी दोघांचा मृत्यू

दरम्यान, म्हैसूर परिसरात वीज पडून आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हुन्सूर तालुक्यातील होसापुरा गावातील यशोदम्मा या शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. ही घटना हालेपुरा गावाजवळ घडली. तसेच एचडी कोटे तालुक्यातील मालदहळ्ळी गावातील अप्पैय्या यांचाही वीज पडून मृत्यू झाला. दुपारी सुमारे एकच्या सुमारास झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. याशिवाय एचडी कोटे परिसरातील अंतरसंते येथे वीज पडल्याने एका गायीचाही मृत्यू झाला आहे.