चांदणीच्या चेहऱ्यावर सपासप केले वार, शाहीदला काय आवडलं नाही?

आरोपीने चांदणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एकामागून एक अनेक वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चांदणीला स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:53 AM • 28 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

चांदणीच्या चेहऱ्यावर सपासप केले वार

point

शाहीदला काय आवडलं नाही?

Crime News : नवरा बायकोचा वाद जीवघेणा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते, पण नियतीच्या मनात असेल ते चुकत नाही. बुधवारी (27 मे) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. पती शाहिद याने भेटण्याच्या बहाण्याने बोलावून आपली 26 वर्षीय पत्नी चांदणी हिची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. आरोपीने चांदणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एकामागून एक अनेक वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चांदणीला स्थानिक नागरिकांनी तातडीने किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी चांदणीचे वडील शफीक यांनी पोलीस ठाण्यात आरोपी जावयाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

सात वर्षांपूर्वी झाले होते लग्न

लखनऊ मधील ऐशबाग येथील रहिवासी शफीक यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी चांदणी हिचे लग्न सात वर्षांपूर्वी शाहिद याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होऊ लागले होते. शाहिद तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे कंटाळून चांदणी गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या माहेरी येऊन राहत होती.

हे ही वाचा : पैशासाठी कायपण! नवऱ्याने आपल्या बायकोचेच दुसरे लग्न लावून दिले, पण...

भेटण्याच्या बहाण्याने बोलावले

बुधवारी दुपारी चांदणी ही सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या आपल्या शेजारच्या वहिनीला भेटण्यासाठी जात होती. त्याच वेळी शाहिदने तिला फोन करून भेटायला बोलावले. दोघेजण भेटल्यानंतर शाहीद तिला एका निर्जन गल्लीत घेऊन गेला आणि जुन्या गोष्टींवरून पुन्हा वाद घालू लागला. वाद वाढल्याने चांदणी तिथून परत जाऊ लागली, तेव्हा संतापलेल्या शाहिदने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात चांदणीच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. ती ओरडत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी तातडीने बाजारखाला पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा : समजून घ्या: सुप्रीम कोर्टाचा SIR वर निकाल, आता महाराष्ट्रात काय होणार?

घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती

पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त कमलेश दीक्षित यांनी सांगितले की, आरोपी शाहिदला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मृत चांदणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती आणि आगामी 9 जून रोजी त्यांच्या समुपदेशनाची (काउन्सिलिंग) तारीख निश्चित झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात झालेल्या वादानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते, मात्र तेव्हा दोघांमध्ये तडजोड झाली होती आणि शाहिदने भविष्यात वाद न घालण्याची हमी दिली होती. असे असूनही चांदणी माहेरीच राहत होती. पती शाहिद हा चांदणीवर नेहमी संशय घेत असे आणि याच संशयातून त्याने तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.