Crime News : मुलीसमोर गाणं गायल्याने तरुणाला तुरुंगात टाकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तरुणाने काही मुलींची छेड काढत 'चोली के पिछे क्या है' असे म्हणत मोठ्याने गाणं गात होता. यामुळे मुलींना लाज वाटू लागली होती, तरुणाने मुद्दामून गाणं गात तरुणीला छेडल्याचा तरुणींनी आरोप केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. आरोपीचं नाव रिजवान कुरेशी असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अल्पवयीन मतिमंद मुलीला बांधकाम सुुरु असणाऱ्या खोलीत नेलं, नंतर 55 वर्षीय नराधमाने केले अत्याचार
गायक आहेस का?
संबंधित प्रकरणात पोलिसांनी तरुणाचे कृत्य पाहताच पोलिसांनी तरुणाला विचारले की, काय गायक आहेस का? तो म्हणाला, 'नाही'. त्यानंतर पोलिसांनी विचारले की, तु गाणे का आणि कोणासाठी म्हणतोय? त्यावर तरुणाच्या कपाळावर घाम आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला फटकारले, 'तू मुलींना छेडत होतास ना? चल तुला तुरुंगातच पाठवतो.' असं पोलीस बोलू लागला होता.
त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्याविरुद्ध पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी राजपूर चुंगी येथील गौरव स्वीट्सजवळ ही घटना घडली होती.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी दारुच्या दुकानाभोवती पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. दुकानाजवळ उभा असलेला तरुण 'चोली के पीछे क्या है' हे गाणं मोठ्याने गाऊ लागला होता. तेव्हाच तिथून जाणाऱ्या तरुणींना हे पाहून लाज वाटू लागली होती. तेव्हा पोलिसांनी तरुणाकडे धाव घेत गाण्याबाबत विचारपूस केली असता, तो घाबरून गेला.
हे ही वाचा : वयाच्या 54 व्या वर्षी महिलेनं 17 व्या बाळाला दिला जन्म, डॉक्टरही चक्रावून गेले, पालनपोषणासाठी 20 टक्के दराने घेतात पैसे
पोलिसांनी ठाण्यात नेलं आणि गाणं गाण्यास सांगितलं नंतर...
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेले. तो पोलीस ठाण्यात दाखल होताच, त्याला लॉकअपमध्ये बंद करण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, आता गाणे गाऊन दाखव, तेव्हा तरुणाच्या घशातून आवाज फुटू लागला नव्हता. तेव्हा तो पोलिसांची माफी मागितली आणि पुन्हा असं कधीच करणार नाही, असे सांगितलं. पण, तरीही त्याला सार्वजनिक ठिकाणी मुलींची छेड काढल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
