Delhi Crime : इंटरव्ह्यूला निघालेल्या तरुणीवर कॅबमध्येच सपासप वार; कारण आलं समोर

रोहिणी ठोंबरे

• 03:57 AM • 13 Oct 2023

देशाची राजधानी दिल्लीत चालत्या कॅबमध्ये एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्याने तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Delhi Crime News A girl was stabbed 13 times in a cab while going to an interview due to one-sided love

Delhi Crime News A girl was stabbed 13 times in a cab while going to an interview due to one-sided love

follow google news

Delhi Crime News : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) चालत्या कॅबमध्ये एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्याने तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (Delhi Crime News A girl was stabbed 13 times in a cab while going to an interview due to one-sided love)

हे वाचलं का?

आता या प्रकरणात अशी माहिती समोर आली आहे की, मुलीच्या कुटुंबीयांनी त्या नराधमाविरोधात पोलिसांकडे (Delhi Police) यापूर्वीच तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी आरोपीवर कोणतीही कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला वडील नाहीत आणि तिची आई इतर लोकांच्या घरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

Ind vs Pak : मोहम्मद शमी इन, ‘हा’ खेळाडू आऊट… पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये फेरबदल?

तरुणीवर 13 वेळा सपासप वार

दिल्लीतील साकेत (लाडो सराई) परिसरात ही घटना घडली. 22 वर्षीय चंद्रिका मलिक कॅबमधून नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असताना लाडो सराईजवळ एका बदमाश तरूणाने कॅब थांबवली आणि त्यात बसला.

या तरुणाने कॅबमध्ये चंद्रिकावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तरुणीने त्याला विरोध करत झटापट केल्याने त्याने धारदार चाकू काढला आणि तिच्यावर अमानुष हल्ला सुरू केला. हा प्रकार पाहून कॅब चालकाने लोकांच्या मदतीने आरोपी तरुणाला पकडले. यावेळी आरोपीने चंद्रिकाच्या चेहऱ्यावर सतत वार केले तसंच तिच्या पोटात आणि पाठीतही वार केले.

लोखंडी सळ्या, जळणारा दिवा अन् 10 वर्षांचा मुलगा; अमरावतीत ‘अघोरी’ कट… पुढे काय घडलं?

पोलिसांनी आधी कारवाई केली असती तर मुलीची ही अवस्था झाली नसती

लोकांनी पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि जखमी चंद्रिकाला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. तिच्या चेहऱ्यावर, मांड्यांवर आणि बोटांवर चाकूने जवळपास 13 वार करण्यात आले. सध्या ती सुरक्षित आहे तिच्या जीवाला कोणताही धोका नसून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर चंद्रिकाची आज अशी अवस्था झाली नसती, असे जखमी चंद्रिकाच्या आईचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी, चंद्रिकाला रस्त्याने त्रास देत होता.

NCP: ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’, सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

दोघेही कंपनीत एकत्र काम करायचे

दोघेही एका कंपनीत एकत्र काम करत होते आणि तिथे त्यांची मैत्री झाली, मात्र आरोपीने त्यांच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावला आणि मुलीशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होता. चंद्रिकाला वडील नाहीत आणि तिची आई घरकाम करून चंद्रिकाच्या पाच भाऊ बहिणींना सांभाळते.

कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वत:ला सक्षम बनवण्याचे चंद्रिकाचे स्वप्न होते. त्यामुळे ती नोकरीच्या शोधात इंटरव्ह्यूसाठी जात होती.

    follow whatsapp