ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला बसमध्ये ओढले अन् नको तेच.. लाज आणणारी घटना

मुंबई तक

14 May 2026 (अपडेटेड: 14 May 2026, 03:49 PM)

Delhi crime : स्लीपर बसमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक केली. या प्रकरणी पीडितेनं धक्कादायक आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे, दरम्यान याबाबत पुढे काय घडलं ते जाणून घ्या..

Delhi crime

Delhi crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने तिला बसमध्ये ओढले आणि नको तेच.. 

point

राणीबाग पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Delhi Crime : राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं. स्लीपर बसमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक केली. पीडितेच्या माहितीनुसार, चालक आणि मदतनीसांनी त्यांना बसमध्ये ओढलं आणि नंतर लैंगिक अत्याचार करून पीडितेला पुन्हा बाहेर फेकून देण्यात आले. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मंगळवारी पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली. यानंतर, चालक आणि कंडक्टरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दिल्ली पोलिसांनी या घटनेत वापरलेली बसही जप्त केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर: 'गुलाबजाम आणले असतील, तर मला दोन दे', गुलाबजामच्या मागणीवरून तरुणाने मित्राला चाकूने भोसकलं

आरोपीने तिला बसमध्ये ओढले आणि नको तेच.. 

पोलिसांच्या माहितीनुसार, ती महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, महिला कारखान्यात काम संपवून घरी येत होती. पीडित महिला सरस्वती विहार येथील बी-ब्लॉक बस स्टँडवर पोहोचली, तिथे स्लीपर बसजवळ उभी असलेल्या एका आरोपीला तिच्या प्रवासाची वेळ विचारली. आरोपीने तिला बसमध्ये ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचारानंतर तिला बसमधून बाहेर फेकण्यात आले. 

राणीबाग पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आणि वैद्यकीय तपासणीनंतर एफआरआय दाखल करण्यात आला होता. नंतर त्याला तात्काळपणे अटक करण्यात आली. या प्रकरणाचा दिल्लीतील राणीबाग पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी संबंधित नराधमांवर भारतीय दंड संहिता कलम 64(1)/70(1)/3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

ज्या बसमध्ये ही घटना घडल्याचा आरोप असा की, बसचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. बस नियमांचे उल्लंघन करून चालवली जात होती. बसला आपत्कालीन गेट देखील नव्हते.