धाराशिव : दारू पाजून डोळ्यात लाल तिखट... अनैतिक संबंध टिकवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

धाराशिवमध्ये अनैतिक संबंधातून एका 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमरगा शहरातील बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्याजवळ ही घटना घडली.

प्रियकराच्या मदतीने पतीलाच संपवलं

प्रियकराच्या मदतीने पतीलाच संपवलं

मुंबई तक

• 12:47 PM • 08 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दारु पाजून डोळ्यात लाल तिखट टाकलं अन्...

point

अनैतिक संबंध टिकवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

point

धाराशिवमधील धक्कादायक हत्याकांड

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अनैतिक संबंधातून एका 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमरगा शहरातील बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्याजवळ ही घटना घडली. शाहूराज महादू सूर्यवंशी (35) असं मृत तरुणाचं नाव असून रविवारी दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला... 

रविवारी सकाळच्या सुमारास कोरेगाववाडी रस्त्यावर शाहूराजचा मृतदेह आढळला आणि स्थानिकांना हे कळताच त्यांनी तातडीने पोलिसांनी याची माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास करण्यास सुरूवात केली. धक्कादायक बाब म्हणजेच, पीडित तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आल्याने मृताची ओळख पटवणं अवघड होतं. त्यानंतर, स्थानिकांची चौकशी आणि तपासाच्या आधारे शाहूराज महादू सूर्यवंशी अशी मृताची ओळख पटली. 

हे ही वाचा: तुळजापूर: आईचे काकासोबत अनैतिक संबंध; वडिलांना सांगणं जीवावर बेतलं, संतापलेल्या काकाने पुतण्यालाच संपवलं

मृताच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध 

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सचा तपास केला असता मृताची पत्नी गौरी सूर्यवंशी (34) हिचे शिवाजी दूधनाळे (32) नावाच्या तरुणाचा या हत्येत सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली आणि अखेर, आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. खरं तर, आरोपी गौरी आणि शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं चौकशीतून समोर आलं. याच विवाहबाह्य संबंधामुळे गौरीचे त्याच्या पतीसोबत सतत वाद व्हायचे आणि याच रागाच्या भरात गौरीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या करण्याचं ठरवलं. 

हे ही वाचा: पुणे: प्रियकराची अडचण दूर करण्यासाठी तरुणीचा मोठा प्लॅन! काकाच्या बंगल्यात घुसले अन्... प्रकरण थेट पोलिसात

पत्नीने प्रियकरासोबत मिळून काढला काटा 

रविवाही पहाटेच्या सुमारास, आधी पीडित तरुणाला दारू पाजण्यात आली आणि नंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याला उमरगा बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, आरोपीने शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हंटर आणि दगडाने ठेचून त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात, पीडित शाहूराजचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp