Dombivli Crime : डोंबिवलीच्या ग्रामीण भागातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय. डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील निळजे गावात एका शाळेत ही संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी वासनांध मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. महेंद्र खैरनार असं पोलिसांनी अटक केलेल्या नराधम मुख्याध्यापकाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : “इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीचा हट्ट अन् पत्नीने दिला नकार! नंतर घडलं असं काही की...
47 वर्षीय मुख्याध्यापकाकडून पहिलीतील मुलीवर लैंगिक अत्याचार
अधिकची माहिती अशी की, डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील निळजे गावातील एका शाळेत मुख्याध्यापकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. निळजे गावातील एका शाळेत एका 47 वर्षीय मुख्याध्यापिकेने सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जातोय.
हेही वाचा : Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!
मुख्याध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
कल्याण तालुक्यातील निळजे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 7 वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. या शाळेत 3 पुरुष तर 2 महिला शिक्षका आहेत. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार यांनी इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आई वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी ही बाब ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखाला सांगितली. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख मुकेश भोईर यांनी या घटनेची दखल घेतली. नराधम मुख्याध्यापक महेंद्र याला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून महेंद्र याला बेड्या ठोकल्या आहेत.
महेंद्र खैरनार हा नराधमाने याआधी 2019 साली मुलींसोबत गैरवर्तन केले होते. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्याकडे केली होती. त्याशिवाय या मुख्याध्यापकाची बदली करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Beed Flood : एक एकराची शेती त्यातही अस्मानी संकट, अखेर शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT
