“इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीचा हट्ट अन् पत्नीने दिला नकार! नंतर घडलं असं काही की...
एका महिलेला तिच्या पतीने एका अशा कारणासाठी घराबाहेर काढलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. संबंधित महिलेने रील बनवण्यास नकार दिल्यामुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

“इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीने पत्नीकडे केला हट्ट

पत्नीने दिला नकार अन् घडलं भयंकर...
Crime News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये, एका महिलेला तिच्या पतीने एका अशा कारणासाठी घराबाहेर काढलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. संबंधित महिलेने रील बनवण्यास नकार दिल्यामुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. महिलेच्या पतीची इच्छा होती की पत्नीने घरी बसून रील बनवावे आणि नंतर त्यापासून पैसे कमवून ते पतीला द्यावे. पण पत्नीने आपल्या पतीच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने तिला घराबाहेर हाकलून लावलं. पतीने घराबाहेर काढल्यामुळे पत्नी तीन दिवस उपोषणाला बसली. नंतर, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पत्नीला घरात प्रवेश मिळाला.
“रील्स बनवून पैसे कमवावे...”
ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील शकुन नगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका नावाची एक महिला गेल्या तीन दिवसांपासून आपल्या पतीच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित महिलेने तिच्या पतीच्या कृत्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसात तक्रार करताना महिलेने सांगितलं की, “साहेब! मी घरी बसून इंस्टाग्राम रील्स बनवावे आणि त्याच्यासाठी पैसे कमवावून द्यावेत, अशी माझ्या नवऱ्याची इच्छा आहे. पण मला ते करायचे नाही. मी नकार दिल्यावर माझ्या पतीने मला घराबाहेर हाकलून लावलं.”
हे ही वाचा: महाराष्ट्रातील 'या' जोडप्याचा मोठा सन्मान! जगभरातील केवळ 10 व्यक्तींना 'हा' पुरस्कार!
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सगळंच सांगितलं
त्यानंतर पोलिसांनी पतीला बाहेर बोलवलं. पोलिसांनी पती आणि पत्नीला समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती शांत झाली. त्यानंतर पत्नीला घरात परत घेण्यातआलं. नौबस्ता रोडजवळील खागा गावात राहणारे दीपिकाचे वडील संतोष कुमार तिवारी यांनी सांगितलं की, "22 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही आमच्या मुलीचे लग्न ठरवले होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण काही काळानंतर मुलीचा नवरा आणि सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. पुढे परिस्थिती इतकी बिकट झाली की पतीने तिला घर सोडण्यास भाग पाडलं.
हे ही वाचा: Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!
पीडितेच्या वडिलांनी पुढे सांगितलं की, "माझा जावई माझ्या मुलीला म्हणाला की, जर पत्नी पैसे कमवेल तरच तो तिला घरात ठेवेल. तो तिला रील्स बनवण्यास भाग पाडत होता. तो म्हणाला की आजकाल सर्व महिला घरी बसून रील्स बनवतात आणि त्यातून पैसे कमवतात. पण दीपिकाने या सगळ्यासाठी नकार दिल्यामुळे जावयाने तिला घराबाहेर हाकलून लावलं. दीपिका तीन दिवस घराबाहेर धरणे आंदोलन करत बसली. "