Crime News: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला चहातून मादक पदार्थ देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर तोंड दाबून तिची हत्या केल्याचं वृत्त आहे. त्यानंतर, आरोपीने पीडितेच्या चेहऱ्याला टेप लावला आणि मृतदेह गंगा नदीत फेकून दिला. खरं तर, मृत महिला त्याच्या प्रियकराकडे पैशांची मागणी करत होती आणि यासाठी प्रियकराने नकार दिल्यानंतर, प्रेयसीने त्याला धमक्या देण्यास सुरूवात केली. प्रेयसीच्या याच धमक्यांना वैतागून आरोपीने तिची हत्या केल्याचं कबूल केलं.
ADVERTISEMENT
कॉल डिटेल्सच्या आधारे मारेकऱ्याचा शोध
संबंधित प्रकरण हे खतौली पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. काही दिवसांपूर्वी, नदीत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी तपास केला असता महिलेची हत्या करून तो मृतदेह नदीत फेकल्याची बाब समोर आली. तपासादरम्यान, पीडितेच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. शुक्रवारी पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव ममता असून संदीप नामदेव नावाच्या तिच्या प्रियकराने तिची हत्या केली.
हे ही वाचा: पतीने नवा मोबाईल घेऊन दिला नाही... नैराश्यात गेलेल्या पत्नीने संपवलं आयुष्य!
प्रियकराकडे पैशांची मागणी
आरोपीच्या चौकशीदरम्यान, जवळपास तीन वर्षांपासून ममतासोबत त्याचे प्रेससंबंध सुरू असल्याचं समोर आलं. या काळात, महिलेला तिच्या प्रियकराने बऱ्याचदा पैशांची मदत केली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पीडितेने पुन्हा तिच्या प्रियकराकडे हजार रुपयांची मागणी केली. आरोपीने तिच्या प्रेयसीला पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे तिने धमक्या देण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध... भावाने प्रियकराला भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन् रक्तरंजित थरार!
याच धमक्यांना वैतागून शनिवारी आरोपीने ममताची हत्या केली. आरोपीने आधी पीडितेला चहातून नशेचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर तिचं तोंड दाबून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर, आरोपीने त्याच्या प्रेयसीला तोंडाला टेप लावला आणि तिचा मृतदेह कापडात गुंडाळून गंगा नदीत फेकून दिला.
ADVERTISEMENT











