कॉन्स्टेबलची प्रेयसी घरात घुसली अन् होत्याचं नव्हतं झालं, बायको आणि मुलाला संपवलं, चाकूने केले 32 वार

कॉन्स्टेबलच्या प्रेयसीने त्याच्या घरात घुसून बायको आणि मुलाची हत्या केली आहे. कॉन्स्टेबलची आणि आरोपी ची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.

crime news

crime news

मुंबई तक

• 11:50 AM • 26 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कॉन्स्टेबलची प्रेयसी घरात घुसली अन् होत्याचं नव्हतं झालं

point

बायको आणि मुलाला संपवलं

point

चाकूने केले 32 वार

Crime News : छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे शनिवारी सकाळी एका विवाहित पोलीस कॉन्स्टेबलच्या प्रेयसीने कॉन्स्टेबलची पत्नी आणि त्याच्या 8 वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. प्रेयसीच्या या हल्ल्यात कॉन्स्टेबलच्या दोन मुलीही गंभीर जखमी झाल्या आहेत. असे सांगितले जात आहे की, हल्ल्यादरम्यान एका मुलीने बाथरूममध्ये लपून आपला जीव वाचवला. ही घटना स्मृती नगर चौकी अंतर्गत असलेल्या STF कॉलनीतील आहे. सरोजिनी भारद्वाज असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे.

हे वाचलं का?

प्रियकराच्या बायकोवर केले 18 वार

आरोपी महिलेने कॉन्स्टेबलच्या पत्नीवर 18 वार आणि झोपलेल्या 8 वर्षांच्या मुलावर चाकूने 14 वार केले आहेत. मृत महिलेचे नाव रीना यादव आहे. तिचे पती ललितेश यादव STF मध्ये कॉन्स्टेबल असून सध्या विजापूर येथे कार्यरत आहेत. ते 15 दिवसांच्या सुट्टीवर दुर्ग येथील घरी आले होते. शनिवारी (25 एप्रिल) सकाळी 8 च्या सुमारास ते रेल्वे स्टेशनवर रिझर्व्हेशन करण्यासाठी गेले होते. त्याच वेळी प्रेयसी सरोजिनी घरात घुसली आणि तिने भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

भिलाई नगरचे सीएसपी सत्यप्रकाश तिवारी यांनी माहिती दिली की, उपचारादरम्यान रीना यादव आणि मुलगा आदित्य यादव यांचा मृत्यू झाला. आसपासच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी (24 एप्रिल) दुपारी सुद्धा आरोपी महिला सरोजिनी कॉन्स्टेबलच्या घरी आली होती. सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू, हायवा आणि कारची समोरासमोर धडक

'असा' घडला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान कॉन्स्टेबल ललितेश यादवच्या पत्नीने आरोपी महिला सरोजिनीचे पाय धरले होते आणि मुलींना पळून जाण्यास सांगितले होते. एक मुलगी तान्या कशीतरी बाहेर पडून शेजाऱ्यांना माहिती देण्यात यशस्वी ठरली, तर दुसरी मुलगी नैना बाथरूममध्ये लपली. माहिती मिळताच शेजारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी महिला सरोजिनीला पकडले. लोकांनी तिच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन पोलिसांना पाचारण केले.

हे ही वाचा : 70 वर्षीय वृद्धाने 26 वर्षीय दिव्यांग तरुणीवर केला बलात्कार, बायकोला दूध आणायला पाठवलं अन्..

फेसबुकच्या माध्यमातून ओळख

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, 25 वर्षीय आरोपी महिला सरोजिनी भारद्वाज घटनेच्या एक दिवस आधीही कॉन्स्टेबलच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी ललितेश यादवने तिची समजूत काढून तिला परत पाठवले होते. आरोपी महिला सरोजिनी भारद्वाज ही जांजगीर जिल्ह्यातील रहिवासी असून ती दुर्गमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. आरक्षकानेच तिला भाड्याच्या घरात ठेवले होते.

अशीही चर्चा आहे की कॉन्स्टेबल आणि आरोपी महिलेने लग्न केले होते. दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ही महिला शनिवारी सकाळी 6.30 वाजता आपले सामान घेऊन आरक्षकाच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली.