दीरासोबत प्रेम जडलं! बायकोने नवऱ्याचा गेमच केला..रेल्वे ट्रॅकवर घडलं तरी काय?

Extra Marital Affaire Shocking News :  जेव्हा एखादा व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो सर्व नातेसंबंध कोणत्याही परिस्थितीत तोडतो. अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार हरियाणाच्या जींदमध्ये घडला आहे.

Extra Marital Affaire Crime News

Extra Marital Affaire Crime News

मुंबई तक

• 07:00 PM • 18 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केला पतीचा खून

point

दीरासोबत प्रेम जडलेल्या महिलेनं केला मोठा कांड

point

पोलीस तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

Extra Marital Affaire Shocking News :  जेव्हा एखादा व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो सर्व नातेसंबंध कोणत्याही परिस्थितीत तोडतो. अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार हरियाणाच्या जींदमध्ये घडला आहे. एका विवाहित महिलेनं तिचं प्रेम मिळवण्यासाठी पतीची निर्घृण हत्या केली. मृताची पत्नी आणि तिचा दीर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं बोललं जातंय. या दोघांनी मिळून साजिदचा खून केला.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत साजिद उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथे राहत होता. त्याचं लग्न सात वर्षांपूर्वी कुलफसा येथे झालं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. सासरी राहत असताना साजिदच्या पत्नीनं तिचा दीर मोहम्मदसोबत अफेअर सुरु केला. तीन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु असल्याचं सांगितलं जातंय. जेव्हा साजिदला या अफेअरबाबत कळलं, तेव्हा जवळपास दोन महिन्यांपूर्वी कुलफसा तिच्या पतीला भेटायला जींद येथे आली होती. साजिद एका वीट भट्टीवर मजुरी करायचा.

साजिदच्या हत्येचा रचला कट

साजिदची पत्नी कुलफसा आणि खालिदचं प्रेमप्रकरण गंभीर झालं होतं, त्यामुळे कुलफसाने साजिदच्या हत्येचा कट रचला. 10 जूनला तिने खालिदला मुजफ्फरनगरहून सफीदोला बोलावलं. प्लॅननुसार कुलफसाने खालिदला रेल्वे ट्रॅकजवळ झाडांमध्ये लपायला सांगितलं. त्याच रात्री कुलफसाना साजिदला टॉयलेटच्या बहाण्याने रेल्वे ट्रॅकवर घेऊन गेली. तिथे खालिद आणि कुलफसाने मिळून साजिदवर चाकूने वार केले. लाकूड आणि दगडांनीही हल्ला करत त्याची हत्या केली.

हे ही वाचा >> आनंदाची बातमी! फक्त 3000 रुपयात वर्षभराचा Toll पास, नितीन गडकरींची मोठी घोषणा

हत्या केल्यानंतर कुलफसा घरी परतली अन्..

साजिदची हत्या केल्यानंतर कुलफसाच्या कपड्यांवर त्याचं रक्त लागलं होतं. त्यामुळे तिने विटभट्टीजवळ असलेल्या टँकरच्या पाण्यात आंघोळ केली आणि पुन्हा घरी परत गेली. खालिद हत्या केल्यानंतर मुजफ्फरनगरला पळून गेला. साजिदचा मृतदेह दोन दिवस रेल्वे ट्रॅकवर पडून राहिला होता. मृतदेहाचा दुर्गंध सुटल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना कळवलं. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

साजिद 10 जूनपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. जीआरपीने प्रभारी श्याम सिंग यांच्या नेतृत्वात तपास सुरु झाला. त्यानंतर कुलफसा आणि खालिदचं मोबाईल लोकेशनची माहिती मिळाली. कुलसफाने तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आणि खालिदचं नावंही घेतलं. पोलिसांनी दोघांना अटक करून घटनास्थळावरून चाकू, लाकडू आणि रक्ताचे डाग लागलेले दगड जमा केले.

हे ही वाचा >> पती बनवत बसला हनिमूनचा प्लॅन, पत्नीचं सुरू होतं भलतीकडेच गुटर गुटर; बॉयफ्रेंडला बोलावलं अन्..

जीआरपी प्रभारी श्याम सिंग यांनी म्हटलं की, 12 जूनला वीटभट्टीजवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर साजिदचा मृतदेह सापडला. पोलीस तपासात हत्या झाल्याचं उघडकीस आलं. कुलफसा आणि खालिदचं टॉवर लोकेशन आणि कॉल डिटेल्समुळे त्यांच्या लोकेशनबाबत माहिती मिळाली. दरम्यान, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

    follow whatsapp