आईचं होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बाप लेकानं रचला कट अन्...नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?

extra marriage affairs : उत्तर प्रदेशातील लखनऊच्या रहीमाबादमध्ये मवई कला गावात एका महिलेचं एक्स्ट्रा मॅरेज अफेयर होतं. यामुळे त्या महिलेच्या मुलाने आणि पतीने तिच्या बॉयफ्रेंडची हत्या करण्यात आली.

crime news mother was having an extra-marital affair

crime news mother was having an extra-marital affair

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 11:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून वय वर्षे 35 असणाऱ्या संजय नावाच्या एका व्यक्तीची हत्या

point

19 वर्षीय दिव्यांश नावाच्या मुलाला अटक

Crime news : लखनऊच्या रहीमाबादमध्ये मवई कला गावातील काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. वय वर्षे 35 असणाऱ्या संजय नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना 15 जून रोजी रात्री घडली असून पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला आहे. या प्रकरणातील आरोपी सुनील कुमार गौतम आणि त्याच्या 19 वर्षीय दिव्यांश नावाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

पोलीस म्हणाले की, एका मीरा नावाच्या महिलेसोबत संजयचे अनैतिक संबंध होते. ती महिला सुनीलची पत्नी आणि दिव्यांशची आई आहे. मीरा अनेक वर्षांपूर्वी आपल्या पत्नीला आणि मुलाला सोडून संजयसोबत लखनऊ महापालिकेच्या घरात राहत होती. यामुळे सुनील आणि दिव्यांशच्या मनात मीराचा राग होता.

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, मीराच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी झाल्याने बाप लेकाने मारण्याचा डाव रचला. पोलिसांनी पुढे सांगितलं की, 15 जूनच्या रात्री ते एका दुचाकीवर स्वार होऊन संजयच्या घरी पोहोचला. अशावेळी त्यांनी दरवाजा वाजवत ते घरात घुसले आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. संजयने त्या ठिकाणाहू पळ काढला आणि नजीक असणाऱ्या 50 मीटर अंतरावरील एका नाल्यात त्याने उडी घेतली. पण अखेर त्याची हत्या करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय स्वत: विवाहित होता. त्याला त्याची पत्नी राणापासून तीन मुले होती. मीरासोबत अफेयर असल्याने राणी त्याच्यापासून वेगळी झाली होती. त्यानंतरच संजय हा मीरासोबत राहू लागला होता. 

हेही वाचा : "धर्मांतरासाठी आलेल्यांचा सैराट करा....", बक्षीस जाहीर करत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

रहिमाबादमध्ये पोलिसांनी आरोपी सुनील आणि दिव्यांश यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी एक बाईक आणि हत्यारे जप्त केली आहेत. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp