वडील दुकानात सोडून गेले, मुलाचा दुसऱ्या दिवशी झुडपात मृतदेह सापडला... जळगावला हादरवणारी घटना

राजेश हा रिंगणगावमध्ये आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसोबतच हार्डवेअरचं दुकान चालवतात.

Mumbai Tak

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जळगावमध्ये 14 वर्षाच्या मुलाची हत्या

point

झुडुपात सापडला मुलाचा मृतदेह

point

कुटुंब मुलगा घरी येण्याची वाट पाहत राहिले, पण...

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगावमध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या हत्येनं खळबळ उडाली. ज्या विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली, त्याचं नाव राजेश गजानन महाजन असं आहे. पोलिसांनी या प्रकरणात नरबळीचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेनं रिंगणगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>पुरोगामी महाराष्ट्र हादरला; धार्मिक संस्थेत विद्यार्थ्याला शॉक देऊन जीवं मारलं, कारण ऐकूण अंगावर येईल काटा

मुलाला दुकानावर बसवलं आणि वडील घरी गेले

राजेश हा रिंगणगावमध्ये आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसोबतच हार्डवेअरचं दुकान चालवतात. सोमवारी (17 जून) गजानन जळगावला कामानिमित्त गेले असता, त्यांनी राजेशला दुकानावर बसण्यास सांगितलं होतं. संध्याकाळी दुकान बंद करून राजेश घरी परत येईल, असं कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. सोमवारी गावात बाजाराचा दिवस असल्यानं कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला आणि रात्री एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

झुडपांमध्ये सापडला मृतदेह...

गावकऱ्यांनी रात्रभर राजेशचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर मंगळवारी (18 जून) सकाळी 6 वाजता गावाशेजारील काटेरी झुडपांमध्ये त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, सखोल तपास सुरू आहे.

हे ही वाचा >>"हिंदी लादणार असाल, तर संघर्ष अटळ...", राज ठाकरे आक्रमक, तिसऱ्या पत्रात थेट इशारा​​​​​​

प्राथमिक तपासात पोलिसांनी नरबळीच्या शक्यतेवर तपास केंद्रित केला आहे. पोलिसांनी तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राजेशने सोमवारी सायंकाळी दुकानात असताना बाजारातून बिर्याणी घेतली होती आणि त्याच्याकडे काही पैसेही होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर तो कुणाच्या संपर्कात आला, याचा पोलिस शोध घेत आहेत.

या घटनेमुळे रिंगणगावात भीतीचे वातावरण पसरले असून, कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    follow whatsapp