Odisha Gang Rape Case : ओडिसाच्या गोपालपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. 20 वर्षांच्या तरुणीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 10 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यापैकी 4 आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं आहे. ही धक्कादायक घटना 15 जूनला घडल्याचं समजते.
ADVERTISEMENT
बरमहपूरच्या एका कॉलेजची विद्यार्थीनी तिच्या मित्रासोबत गोपालपूरला फिरायला गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दोघेही पतनिवास हॉटेलच्या मागे सुनसान जागेवर फिरत होते. तेथे काही अंतरावर अन्य तरुणही बसलेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजताच्या सुमारास 10 तरुणांचा एक ग्रुप त्यांच्याजवळ आला.
हे ही वाचा >> आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...
त्यानंतर त्या नराधमांनी तरुणीच्या मित्राला बांधून ठेवलं आणि त्याठिकाणाहून दूर नेलं. पाच जणांनी पीडितेच्या मित्राला पकडलं आणि अन्य पाच लोकांनी त्या विद्यार्थीनीसोबत सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला धमकीही दिली. पोलिसांना कळवलं तर तुमच्यासोबत चांगलं होणार नाही, अशी धमकी दिली.
पीडितेने पोलिसांत केली तक्रार
या गंभीर घटनेनंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास पीडित तरुणीने तिच्या मित्रासोबत गोपालपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार केली. त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर गोपालपूर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तर अन्य आरोपींना पकडण्यासाठी एक टीम गठित केली. याप्रकरणी पोलिसांनी 70(1), 296, 351(3), 310(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा >> पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
याप्रकरणी माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, ओडिसाचं प्रमुख पर्यटन स्थळ गोपालपूर बीचवर घडलेली सामूहिक बलात्काराची घटना संतापजनक आहे. या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. पर्यटन स्थळावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने सतर्क राहिले पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर पावलं उचलली पाहिजेत.
ADVERTISEMENT
