पत्नीला कोयत्यानं मारून संपवलं, मध्ये येणाऱ्या चिमुकल्यांवरही वार... पंढरपुरात पती का झाला राक्षस?

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 11:14 AM)

Pandharpur Crime News : तानाजी उबाळे हा आपल्या कुटुंबासह टाकळी येथे राहतो. पत्नी पल्लवी यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पंढरपूरमधील धक्कादायक घटना

point

पत्नीने प्रतिकार केला, पण रक्तस्त्रावाने मृत्यू

point

आईला वाचवण्यासाठी मध्ये आलेले मुलंही जखमी

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील टाकळी गावात बुधवारी पहाटे एका धक्कादायक घटना घडली.  या घटनेनं सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तानाजी उबाळे या व्यक्तिने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी पल्लवी उबाळेचा जागीच मृत्यू झाला. तर तानाजी आणि त्याची दोन लहान मुलंही झटापटीत जखमी झाले आहेत. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी उबाळे हा आपल्या कुटुंबासह टाकळी येथे राहतो. पत्नी पल्लवी यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. बुधवारी पहाटे पुन्हा याच कारणावरून त्यांच्यात वाद उफाळला. 

हे ही वाचा >>'राजा'सारखंच वीरूला संपवलं... लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच उशीने तोंड दाबून...

Tबाप जेव्हा आपल्या आईवर हल्ला करत होता, तेव्हा दोन्ही लहान मुलं आईला वाचवायला धावली. पल्लवी यांना वाचवण्यासाठी धावलेल्या या दोन लहान मुलांवरही तानाजीने वार केले. पल्लवी यांनीही प्रतिकाराचा प्रयत्न केला, यात तानाजी स्वतः जखमी झाला.

सध्या तानाजी आणि त्याच्या दोन्ही मुलांवर पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पल्लवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा >>आईचं होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बाप लेकानं रचला कट अन्...नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अशा हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.