हसावं की रडावं? पत्नी बॉयफ्रेंडला भेटायला गेल्यानं पतीनं चावलं पत्नीचं नाक अन्....

extra marrital affair : दोन मुलांची आई असलेली महिला पूजा देवी तिच्या प्रियकाला भेटण्यासाठी गेली. तिच्या पतीने रागाच्या भरात केलेल्या कृत्याने हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. पतीने रागाच्या भरात आपल्या बायकोचे नाक चावलं आहे.

extra marrital affair

extra marrital affair

मुंबई तक

21 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 12:28 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई असलेली महिला पूजा देवी तिच्या प्रियकाला भेटण्यासाठी गेली

point

पतीने पत्नीला समजावलं पण पत्नी ऐकत नसल्याने पतीने तिच्या नाकाचा चावा घेतला

Extra marrital affair : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. दोन मुलांची आई असलेली महिला पूजा देवी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. यामुळे पतीने केलेल्या कृत्यावर हसावं की रडावं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पतीने रागाच्या भरात आपल्या बायकोचे नाक चावलं आहे. हे प्रकरण हरदोई ठाणे हरियावा भागातील देवरिया नगर येथील आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'इथं सिगारेट पिऊ नका' तरुणाने पर्यटकांना सांगितलं अन् आरोपींनी दगडाने ठेचत...पानशेत हादरलं

पतीचे नाव हे रामखेलानवर असे आहे. तर पत्नीचे नाव हे पूजा देवी असे आहे. रामखेलानवरचा 10 वर्षांपूर्वी पूजा देवीसोबत विवाह झाला होता. पूजा देवीचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती पतीला आधीच झाली होती. त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु पूजाने ऐकलं नाही. 

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा देवी तिचा प्रियकर सुशीलला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. जेव्हा तिच्या पतीला याबाबत माहिती मिळाली असता, तोही त्या ठिकाणी गेला. त्याने आधी पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची पत्नी परत येण्यास नकार देत होती, तेव्हा तो संतापला आणि त्याने पत्नीचे नाक चावले. 

यानंतर तिच्यावर एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. परिस्थिती पाहता, डॉक्टरांनी पूजाला लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात महिलेनं पोलीस ठाणे गाठलं आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली, यामुळे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

हेही वाचा : धनशक्ती राजयोगाने 'या' राशी होणार मालामाल, तुमच्याही राशीचा असेल समावेश

पती गजाआड 

पीडितेनं दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, तिच्या पतीने तिला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी तिथून प्रियकराकडे गेली, असा तिनं आरोप केला. या तक्रारीवरून पोलिसांनी रामखेलवनला अटक केली. हरदोईचे सीओ अजित चौहान म्हणाले की, पत्नीला मारहाण केली आणि तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    follow whatsapp