महिलेचा बेडरुममध्ये रंगला होता रोमान्स, अचानक पती आला अन् नको तेच...

मुंबई तक

21 Jun 2025 (अपडेटेड: 21 Jun 2025, 11:50 PM)

Extramarrital Affairs : एका 2 मुलांच्या आईचं एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडीपीसी झाली होती. तिनं एके दिवशी आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावलं. त्याचवेळी तिचा पती घरी आला असता, तिच्या प्रेमसंबंधाचं भांडाफोड झाला. 

Extramarrital Affairs

Extramarrital Affairs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

2 मुलांच्या आईचं एका तरुणासोबत अनैतिक संबंध

point

पतीने रंगेहाथ पकडताच तरुणाला बेदम मारहाण

Extramarrital Affairs : प्रेमाला कोणतंही वय नसतं असं आपण अनेकदा ऐकलं असेलच. असंच एक प्रकरण बिहारमधील पूर्णिया येथील आहे. 2 मुलांच्या आईचं एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडीपीसी झाली होती. तिनं एके दिवशी आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावलं. त्याचवेळी तिचा पती घरी आला असता, तिच्या प्रेमसंबंधाचं भांडाफोड झाला. 

हे वाचलं का?

महिलेचं नाव सोनी देवी असून ती चूनापुर येथील रहिवासी आहे. तर मोहम्मद कुर्बान या दोघांचे अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. सोनीच राजेश ऋषीसोबत विवाह झाला होता. तसेच महिलेला दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी लग्नाला आल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे कुर्बानसोबत तीन वर्षांपासून संबंध होते. मात्र, गुरूवारी ते दोघेही एकत्र घरात बेडरूममध्ये रोमान्स करत होते. त्यावेळी पती राजेश ऋषीनं त्याला रंगेहाथ पकडलं होते. 

नेमकं 'त्या' रात्री काय घडलं होतं?

प्रेमात वेडीपीसी झालेल्या महिलेनं तरुणाला रात्री घरी बोलावलं. अशावेळी प्रियकरही तिच्या घरी गेला. दोघांचा बेडरूममध्ये रोमान्स सुरु झाला. महिलेचा पती अचानकपणे बेडरूममध्ये आला, अशावेळी दोघेजण विवस्त्र बेडवर होते. ही परिस्थिती महिलेच्या पतीने पाहिल्यानंतर त्याने आरडाओरड केली. 

पतीचा आवाज ऐकून लोक गोळा झाले. गावकऱ्यांनी महिलेच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांचंही ऐकलं नाही. पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आणि तरुणाला सोडवलं.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेनं बॉयफ्रेंडला फोनद्वारे संपर्क करत सांगितलं की, तिचा पती राजेश हा शेतातच राहणार आहे. बॉयफ्रेंड तिच्या सांगण्यावरून रात्री तिच्या घरी गेला. त्यावेळी तिचा पती घरी गेल्यानंतर त्याने हे चित्र पाहले आणि कांगावा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी कुर्बानला एका झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली.