सासरा सुनेच्या बेडरुममध्ये गेला अन् बलात्कार केला... नवरा थांबलेला रुमबाहेरच पण...

हरियाणातील फरीदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या सुनेला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार आणि हत्या (सांकेतिक फोटो, सौजन्य: Grok)

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार आणि हत्या (सांकेतिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

27 Jun 2025 (अपडेटेड: 27 Jun 2025, 10:56 PM)

follow google news

फरीदाबाद (हरियाणा): सासऱ्याने स्वत:च्या सुनेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणाच्या फरीदाबादमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सासऱ्याने आती सुनेला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. नराधम सासरा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. नंतर, सासरकडील लोकांनी मिळून सुनेचा मृतदेह घरानजीकच्या एका खड्ड्यात पुरला. 

हे वाचलं का?

दरम्यान, तब्बल दोन महिन्यांनंतर या हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी सासरा आणि सासूला अटक केली आहे. तर मृत महिलेचा पती अजूनही फरार आहे. 

नेमकी घटना काय?

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान, आरोपी सासऱ्याने उघड केले की ही हत्या पूर्वनियोजित होती. 24 वर्षीय सुनेचा हत्येचा कट 15 एप्रिल रोजी रचण्यात आला होता. तिचा नवरा आणि सासूही या योजनेत सहभागी असल्याचा आरोप आहे. आरोपी सासऱ्याने खुलासा केला की योजनेनुसार, पीडितेच्या सासूला 15 एप्रिल रोजी तिच्या भाचीच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशातील एटा येथे पाठवण्यात आले होते.

हे ही वाचा>> मुलीच्या पोटात दुखायला लागलं अन् बापाचं घाणेरडं कृत्य समोर आलं, आईलाही माहिती होतं पण...

जेवणात मिसळल्या झोपेच्या गोळ्या 

21 एप्रिलच्या रात्री अरुणने त्याची पत्नी आणि बहीण काजल यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. दोघीही आपआपल्या खोल्यांमध्ये गाढ झोपी गेल्या. सासरा एकटाच सुनेची हत्या करेल असा मूळ कट होता. त्यामुळे बायको बेशुद्ध झाल्याचं दिसून येताच पती अरूण हा खाली निघून आला आणि त्याने वडिलांना वर जाण्यास सांगितलं. 

जेव्हा सासऱ्याने सुनेच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याने ओढणीने सुनेचा गळा दाबण्याची तयारी केली. पण तिचा गळा दाबण्यापूर्वी त्याने बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या सुनेवर आधी बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली. पण सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याचं आपल्या मुलाला किंवा पत्नीला अजिबात सांगितलं नाही.

हे ही वाचा>> पती-पत्नी शारीरिक संबंधाचे करायचे Live स्ट्रिमिंग, लाखो लोक पाहायचे अन् उधळायचे तुफान पैसे!

घराजवळच्या खड्ड्यातच सुनेलं पुरलं!

काही वेळाने, त्याने त्याच्या मुलाला वरच्या मजल्यावर बोलावले आणि दोघांनीही मृतदेह उचलला आणि घरानजीक रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात फेकून दिला. त्यानंतर त्यांनी तो खड्डा विटा आणि दगडांनी भरला. पण अखेर दोन महिन्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

दरम्यान, या प्रकरणी पल्ला पोलीस ठाण्यात सासरे, सासू, पती आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह दोन महिने घरासमोरील खड्ड्यातच होता. पण ती बेपत्ता झाली आहे असं आरोपी इतरांना सागंत होते.

    follow whatsapp