'पती मित्राला घेऊन आला घरी, दोघांचे अश्लील चाळे...', 'त्या' गोष्टीने महिला हादरली!

crime news : पत्नीनं आपल्या पतीवर आणि त्याच्या मित्रावर एफआरआय दाखल करत खरी खोटी सुनावली. नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:17 PM • 27 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीनं आणि मित्राचे महिलेसमोर वाईट कृत्य

point

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं घेतला मोठा निर्णय

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या मित्रासोबत मिळून केलेल्या कृत्याविरोधात पत्नीनं एफआरआय दाखल केला आहे. पत्नीनं या घटनेवर भाष्य करत खरी खोटी सुनावली. पत्नी म्हणाली की, पतीच्या वागण्याने मला नाविलाजाने वेगळं राहावं लागत आहे. एक दिवस माझा पती अचानकपणे माझ्या घरी आला आणि त्यावेळी त्याचा एक मित्रही तिथं होता. दोघांनी माझ्यासमोर पुन्हा अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. मी विरोध केला तेव्हा दोघेही संतापले. त्यांनी मला मारहाण केली आणि मला सतत धमकावत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "ठाकरे ब्रँड इज ब्रँड..." राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ट्विट करत...

महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आता या प्रकरणाचा पुढील तपास केला आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना गोरखपूर येथील चिलुआताल पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या महिलेनं पतीवर गंभीर आरोप केला आहे. पती नेहमी तिच्याशी वाद घालतो. महिलेचं म्हणणं आहे की, तिचा पती तिच्याशी चांगलं वागत नाही. तिला नेहमी हडतुड करतो.  

त्याने तिच्याशी विनाकराण भांडण केलं आणि तिला घरातून निघून जाण्यास सांगितलं. महिलेचं म्हणणं आहे की, तिनं तिच्या पतीला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कधीच ऐकलं नाही. पतीने तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर ती महिला मोहरीपूरजवळ एका भाडेतत्वावर खोली घेऊन राहू लागली होती. त्यानंतर पतीच्या कारवाया थांबतच नव्हत्या.

महिलेच्या म्हणण्यानुसार, 4 जून रोजी तिचा नवरा तिच्या एका मित्रासोबत घरी आला होता. त्यांनी एकमेकांसोबत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. त्याच महिलेचं म्हणणं आहे की, तिने दोघांनाही असे कृत्य करण्यास विरोधदर्शवला. त्यावेळी दोघेही संतापले त्यांनी धमक्या देण्यास सुरूवात केली. 

हेही वाचा : सांगलीत खळबळ! पतीने कसलाही विचार न करता पत्नीच्या डोक्यात बांबूनं केला हल्ला अन्...

पती आणि त्याच्या मित्राच्या अश्लील कृत्यांमुळे अस्वस्थ झालेल्या महिलेनं पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर तिनं दोघांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करू लागले आहेत. तपासात जे काही आहे ते लवकरच बाहेर येईल त्याच्या आधारे कारवाई केली जाईल असे पोलिसांचं म्हणणं आहे. 

    follow whatsapp