ओठ, अंडरआर्म्स, प्रायव्हेट पार्टची 7 वेळा सर्जरी, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लोलाचा सगळं सीक्रेटच...

मुंबई तक

27 Jun 2025 (अपडेटेड: 27 Jun 2025, 12:45 PM)

Sex Racket : लोलाने शरीराच्या एकूण सात भागात प्लास्टिक सर्जरी केली होती. प्लास्टिक सर्जरी करण्याचं कारण आता समोर आलेलं आहे. सेक्स रॅकेटसाठी तिनं हे पाऊल उचललं होतं. मात्र, आता या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Sex Racket

Sex Racket

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लखनऊमध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

महिलेनं केलं असं कांड की प्रकरण आलं समोर

Sex Racket : उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. या सेक्स रॅकेटने सुरक्षा यंत्रणांनाही धक्का दिला आहे. उझबेकिस्तानच्या लोला कायुमोवाया (वय 49) ही महिला एक सेक्सरॅकेट चालवायची. धक्कादायक प्रकरण म्हणजे लोलाने बनावट विवाह प्रमाणपत्र वापरून आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले. तिनं तिची खोटी ओळख लपवत ती वर्षानुवर्षे लखनऊमध्ये राहू लागली होती. तिनं चालाखीनं पोलिसांना आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणांना किंचितसाही सुगावा लागू दिला नाही. सध्या लोला फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "ठाकरे ब्रँड इज ब्रँड..." राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ट्विट करत...

प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, लोला कायुमोवा हा तिचा क्लायंट होता. मात्र, पती म्हणून त्याची ओळख सांगू लागली होती. या महिलेनं लखनऊमध्ये ओमॅक्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आणि ती स्वत: भारताची नागरिक असल्याची खोटी ओळख सांगत होती. 

ती इथवरच न थांबता तिनं आपलं वय लपवण्यासाठी एक दोन नाहीतर तब्बल सात वेळा प्लास्टिक सर्जरी केली. या सर्जरीत चेहरा, ओठ, अंडरआर्म्स आणि प्रायव्हेट पार्टची कॉस्मेटिक सर्जरी केली.

पोलिसांकडून पर्दाफाश 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोलाचे सेक्स रॅकेटशी पूर्वीपासून नाव जोडले गेले होते. यापूर्वीच उझबेकिस्तानातील होलिदा आणि निलोफर या महिलांना या रॅकेटमध्ये पकडण्यात आले. 21 जून रोजी सुशांत होल्फ सिटी पोलिसांनी रेड टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

हेही वाचा : सांगलीत खळबळ! पतीने कसलाही विचार न करता पत्नीच्या डोक्यात बांबूनं केला हल्ला अन्...

सध्या, पोलिस लोला कायुमोवाता शोध घेतला, ती घटनेपासून फरार असल्याचे म्हटले जात होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत परदेशी महिलेच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात आली. तसेच सहकाऱ्यांच्या भूमिकेचा सखोल तपास करण्यात आला आहे. या खुलाशामुळे राजधानी लखनऊमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर आणि कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.