तारूण्यासाठी प्रायव्हेट पार्टची सर्जरी करायची 'ही' महिला, लोला आहे तरी कोण?

Crime News: लखनऊमध्ये एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोला नावाची एक महिला तिची ओळख लपवून लखनऊमध्ये राहत होती. एवढंच नव्हे तर ती तिच्या प्रायव्हेट पार्टची सर्जरी देखील करून घेत होती.

सेक्स रॅकेट चालवणारी लोला आहे तरी कोण?

सेक्स रॅकेट चालवणारी लोला आहे तरी कोण?

मुंबई तक

• 10:13 PM • 26 Jun 2025

follow google news

लखनऊ: लखनऊमध्ये एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ज्यामध्ये उझबेकिस्तानमधील लोला कायूमोवा ही महिला मुख्य आरोपी म्हणून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोलाने बनावट विवाह प्रमाणपत्राद्वारे तिचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवले आणि ती वर्षानुवर्षे तिची ओळख लपवून लखनऊमध्ये राहत होती. इतकेच नाही तर तिने भाडेपट्टा पडताळणी देखील बनावट पद्धतीने करून घेतली होती आणि पोलिसांपासून ते स्थानिक गुप्तचर युनिट (LIU) पर्यंत कोणालाही त्याचा पत्ता लागला नाही.

हे वाचलं का?

लोलाने ज्या व्यक्तीला तिचा पती म्हणून सांगितले तो होता तिचा ग्राहक

लोलाने ज्या व्यक्तीला तिचा पती म्हणून सांगितले तो प्रत्यक्षात तिचा क्लायंट होता. तिने ओमेक्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅटही खरेदी केला होता आणि ती स्वतःला भारतीय नागरिक म्हणून दाखवत होती. 49 वर्षीय लोलाने तिचे वय लपवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी तब्बल 7 वेळा प्लास्टिक सर्जरी केली होती.

हे ही वाचा>> पुतण्या काकीसोबत रोज शारीरिक संबंध करायचा..एक दिवस घडलं भयंकर! प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये

ज्यामध्ये तिने चेहरा, ओठ, अंडरआर्म्स आणि प्रायव्हेट पार्टची कॉस्मेटिक सर्जरी केली होती. या सर्व सर्जरी तिने अहिमामऊ येथील डॉ. विवेक गुप्ता यांच्या क्लिनिकमध्ये करण्यात आल्या होत्या.

होलिडा आणि निलोफर यांनाही अटक

पोलिस सूत्रांनुसार, लोलाचे नाव आधीच सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी जोडले गेले आहे. यापूर्वी, उझबेकिस्तानमधील होलिडा आणि निलोफर या आणखी दोन महिला देखील या रॅकेटमध्ये अडकल्या आहेत. 21 जूनच्या रात्री सुशांत गोल्फ सिटी पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा भांडाफोड केला.

हे ही वाचा>> तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...

फरार झाली लोला

सध्या, पोलीस लोला कायूमोवा हिचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप ती पोलिसांना सापडलेली नाही. फरार असलेली लोला नेमकी भारतातच आहे की तिने भारतातून पळ काढलाय याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. 

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता परदेशी महिलेच्या कागदपत्रांची सत्यता, तिचा भारतात येण्याचा उद्देश आणि स्थानिक सहकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. या खुलाशामुळे लखनऊमधील सुरक्षा व्यवस्था आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

    follow whatsapp