सरकारी नोकरी जाण्याची भिती, तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली... नेमकं काय कारण?

एका जोडप्याने नोकरी वाचवण्यासाठी त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली...

तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली...

मुंबई तक

• 04:16 PM • 01 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं

point

नेमकं काय कारण?

Crime News: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका जोडप्याने नोकरी वाचवण्यासाठी त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींनी त्यांच्या नवजात बाळाला एका जंगलात नेलं आणि नंतर त्याला दगडाखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. परंतु, सुदैवाने गावकऱ्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि त्याचे प्राण वाचवले.

हे वाचलं का?

नवजात बाळाला जंगलात सोडलं 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी जोडप्याविरुद्ध कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारी नोकरी वाचवण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला जंगलात मरण्यासाठी सोडून दिले होतं, असं तपासात दिसून आलं. आरोपी जोडप्याचं हे चौथं मूल असल्याची माहिती समोर आली आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या स्थानिकांनी त्याला वाचवलं. त्यानंतर, पीडित बाळाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

हे प्रकरण धनोरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नांदनवाडी गावातील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी पीडित बाळाचे आरोपी वडील बबलू दंडोलिया आणि आई राजकुमारी दंडोलिया यांना अटक केली असून ते तामिया पोलिस ठाण्याच्या सिधौली गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सरकारी नोकरी जाण्याची भिती  

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील बबलू दंडोलिया हे नंदनवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीचे शिक्षक आहेत. त्यांना आधीच दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना नुकतंच चौथं मूल म्हणजे एक मुलगा झाला. नोकरी जाण्याच्या भीतीने, आरोपींनी या बाळाला एक ओझं मानून त्याला जंगलात नेलं आणि दगडाखाली दाबून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन्ही आरोपी त्या जंगलात मुलाला टाकून पळून गेले.

हे ही वाचा: आई झाल्यानंतर वजन खूप वाढलं! पतीला खटकलं अन् रागाच्या भरात पत्नीसोबत केलं भयानक कृत्य...

बाळाच्या शरीरावर खोल जखमा   

अचानक रस्त्याने जात असताना गावकऱ्यांना जंगलातून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यावेळी गावकरी जंगलात धावत गेले असता तिथे त्यांना दगडाखाली एक नवजात बाळ आढळलं. त्याचं शरीर मुंग्यांनी भरलेलं होतं आणि शरीरावर बऱ्याच ठिकाणी खोलवर जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अॅम्ब्यूलन्स घटनास्थळी दाखल झाली, तातडीने बाळाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.

हे ही वाचा: तिन्ही मित्रांनी एकत्र नदीत उडी मारली अन् आयष्य संपवलं! इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं प्रकरण काय?

आरोपी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल  

सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात नवजात बाळाला सोडून देण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासात हा पूर्वनियोजित हत्येचा प्रयत्न असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जोडप्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp