Arun Gawli Latest News : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अरुण गवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सोडण्यात आलं. त्यानंतर अरूण गवळी विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी डॅडी उर्फ अरुण गवळीला जामीन मंजूर केला. मुंबईत 2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
ADVERTISEMENT
वाढतं वय आणि तब्येतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर केला. अरुण गवळी 17 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होता. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी गवळीला जन्मठेपेच्या शिक्षेसह 17 लाखांचा दंड ठोठावला होता.
चिंचपोकळी विभागाचा आमदार होता अरुण गवळी
अरुण गवळी 2004 ते 2009 पर्यंत मुंबईच्या चिंचपोकळी विभागाचे आमदार होता. अरुण गवळीने 'अखंड महाराष्ट्र सेना'हा पक्ष सुरु केला होता. आमदारकीच्या कार्यकाळात गवळीने जामसांडेकरांची हत्या केली होती, असा आरोप होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. गववळीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा GR काढला, पण त्याचा खरा अर्थ काय?
अरुण गवळीला कसं मिळालं 'डॅडी' हे नाव?
वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अरुण गवळीने शाळा सोडल्यानंतर दूध विक्रीचा धंदा सुरु केला होता. शाळेच्या दिवसांपासूनच गवळी छोट्या-मोठ्या गँगस्टर्सच्या संपर्कात होता. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गवळी विविध गँगमध्ये सामील झाला. तस्करी आणि खंडणी उकळणे, असे गुन्हे करत गवळीने त्याच्या क्राईम करिअरची सुरुवात केली.
1986 पर्यंत मायानगरी मुंबईत दाऊद इब्राहिम खूप लोकप्रिय होता. पण मुंबई पोलिसांचा ससेमीरा सुरुच राहिल्याने दाऊदला 1988 मध्ये मुंबई सोडावी लागली. तेव्हा गवळीचा मित्र रामा नाईक एका गँगवारमध्ये मारला गेला होता. गवळीने मित्राचा बदला घेण्यासाठी दाऊदची गँग सोडली आणि एक वेगळी गँग सुरु केली. तेव्हापासूनच दाऊद-गवळीमध्ये दुश्मनी सुरु झाली. दाऊदने भारत सोडलं होतं आणि गवळीने मुंबईत गुन्हेगारी वाढवली होती. त्यानंतर गवळीचे चाहते त्याला डॅडी म्हणू लागले.
हे ही वाचा >> शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवलं! नराधमांनी शेतात नेऊन गँगरेप केला अन् गुंगीचं औषध दिलं, पण 5 दिवसानंतर...
गुन्हेगारीपासून आमदारकीचा प्रवास
अरुण गवळीने संघटित गुन्हेगारी सुरु केल्यानंतर मुंबईत दहशत पसरवली. गुन्हेगारीसोबत गवळीने 2004 मध्ये 'अखंड महाराष्ट्र सेना' पक्ष सुरु केला. गवळीने चिंचपोकळी विधानसभेतून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. आमदार झाल्यानंतर 2008 मध्ये गवळीला शिवसेना नगरसेवक जामसांडेकर हत्याप्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. या हत्या प्रकरणात गवळीला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अरुण गवळीवर चित्रपटही बनवला
अरुण गवळीचा गँगस्टर म्हणून मुंबईत मोठं नाव होतं. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम, छोटा राजननंतर अरुण गवळीनं मुंबईत दहशत पसरवली होती. गवळी प्रचंड लोकप्रिय असल्याने त्याच्यावर एक चित्रपटही काढण्यात आला. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटात अर्जुन रामपालने अरुण गवळी यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. तर मराठी चित्रपट दगडी चाळमध्ये मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळींची व्यक्तीरेखा साकारली होती.
ADVERTISEMENT
